ADVERTISEMENT

तेजश्री प्रधानचा नववधूप्रमाणे लूक सोशल मीडियावर व्हायरल; चाहत्यांनी केली कमेंट्सची बरसात

tejashri pradhan navvadhu look photo viral : तेजश्री प्रधानने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून, त्यात ती नववधूप्रमाणे सजलेली दिसते. या फोटोवर नेटकऱ्यांनी अक्षरशः कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
tejashri pradhan navvadhu look photo viral

tejashri pradhan navvadhu look photo viral : मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्री तेजश्री प्रधान (tejashri pradhan) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. झी मराठीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत सध्या ती स्वानंदी ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, स्वानंदीचा साधा पण ठाम स्वभाव, घरातील सर्वांची काळजी घेणारी वृत्ती आणि भावनिक परिपक्वता या सगळ्यामुळे ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे.

अलीकडेच तेजश्री प्रधान हिने आपल्या मालिकेतील गेटअपमधील एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती पारंपरिक नववधूप्रमाणे सजली असून तिचा लूक पाहून चाहते अक्षरशः भारावून गेले आहेत. तेजश्रीने गुलाबी रंगाचा शालू नेसला आहे, खांद्यावर हिरव्या रंगाचा शेला, कपाळावर मुंडावळ्या, हातात हिरव्या बांगड्या आणि गळ्यात दागिने अशा पारंपरिक मराठी साजात ती खुलून दिसत आहे. हातावरची मेंदी आणि चेहऱ्यावरचं हास्य तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे.

हा फोटो शेअर करताना तेजश्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “परीकथा खूप सुंदर असू शकतात” आणि त्यासोबत हार्ट इमोजीही दिली आहे. तिच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे. एका चाहत्याने लिहिले, “नवराई माझी!”, तर दुसऱ्याने कमेंट केली, “पाहताना तुला चंद्रही लाजला.” काहींनी तर तिच्या लूकचं कौतुक करत लिहिलं, “प्रत्येक अवतारात तू अप्रतिम दिसतेस, तुझ्या लग्नानंतरचा लूक पाहायला उत्सुक आहोत.”

अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत तिचं कौतुक केलं असून, काहींनी तिला “सुंदरी”, “देवीसमान” अशा शब्दांत गौरविले आहे. तेजश्री प्रधान हिच्या या पोस्टने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला असून, चाहत्यांनी तिच्या नव्या लूकवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

हे पण वाचा.. तू ही रे माझा मितवा’ मालिकेचे ३०० भाग पूर्ण; सेटवर साजरा झाला आनंदोत्सव, अर्णव-ईश्वरी म्हणाले..

दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत सध्या स्वानंदी आणि समर तसेच रोहन आणि अधिराच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. आगामी भागांमध्ये नेमकं काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. तेजश्री प्रधान हिच्या मोहक व्यक्तिमत्त्वाने आणि अभिनयाने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की ती मराठी मनोरंजन विश्वातील एक तेजस्वी नाव आहे.

हे पण वाचा.. नवरी मिळे हिटलरला’ फेम प्रसाद लिमये पुन्हा नव्या भूमिकेत; चाहत्याला दिलं खास उत्तर!

tejashri pradhan navvadhu look photo viral