ADVERTISEMENT

प्रेमाची नवी चाहूल! अर्णवच्या भावना ऐकून ईश्वरीच्या मनात उमललं प्रेम – तू ही रे माझा मितवा मालिकेत रोमँटिक ट्विस्ट

tu hi re maza mitwa ishwari arnav love new turn : तू ही रे माझा मितवा मालिकेत ईश्वरीला अखेर अर्णवचं खरं मन उमजायला लागलं आहे. एका खास प्रसंगात अर्णवने "माझी ईश्वरी" असा उल्लेख करताच तिच्या मनात प्रेमाची पहिली ठिणगी पेटली असून प्रेक्षकांमध्येही जलद उत्सुकता वाढली आहे.
tu hi re maza mitwa ishwari arnav love new turn

tu hi re maza mitwa ishwari arnav love new turn : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका तू ही रे माझा मितवा (Tu Hi Re Maza Mitwa) आता एका नव्या आणि मधुर टप्प्याकडे वाटचाल करताना दिसत आहे. सुरुवातीला जबरदस्तीनं उभं राहिलेलं लग्न, गैरसमजांची जाळी आणि राकेशच्या कारस्थानांमुळे अर्णव–ईश्वरीचं नातं खडतर वळणावर आलं होतं. मात्र हळूहळू एकमेकांच्या मनातील गोष्टी समजून घेत दोघांच्या नात्यात विश्वासाची नवी बीजं रोवली गेली आहेत. आणि आता या मालिकेत प्रेमाचा नवा प्रवास पाहायला मिळणार आहे.

राकेशने कधी ईश्वरीला मानसिक त्रास दिला, तर कधी अर्णवच्या जीवावर देखील उठला. पण ईश्वरीच्या योग्य वेळी हस्तक्षेपामुळे अर्णव वाचला आणि इथूनच त्यांच्या नात्यात बदल घडू लागला. अर्णवने संयमाने पत्नीच्या मनातील गैरसमज संपवण्याचा प्रयत्न केला आणि आता ते दोघं एकत्र येऊन राकेशला धडा शिकवण्याच्या तयारीत आहेत.

याचदरम्यान, एका मुलाखतीत अर्णवला ईश्वरीबद्दल विचारलेला प्रश्न प्रसंगाला नवा रंग देतो. “ईश्वरीने पैशासाठी लग्न केलं का?” या प्रश्नावर अर्णव क्षणाचाही विचार न करता म्हणतो, “माझ्या ईश्वरीच्या मनाची श्रीमंती पैसे मोजून मोजता येणार नाही.” त्याच्या या वाक्यानं ईश्वरीचं मन जिंकलं असून ती मनातल्या मनात त्याच्याबद्दल अनामिक ओढ अनुभवू लागली आहे. ती स्वतःशीच विचारते, “हेच का प्रेम?”

आता मालिकेत ईश्वरीला जाणवतं आहे की ती अर्णवच्या प्रेमात पडते आहे. मात्र हे भावना ती त्याच्यासमोर कधी आणि कशा मांडणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे. ७ आणि ८ नोव्हेंबरच्या भागांमध्ये हा सुंदर क्षण पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

हे पण वाचा.. हा पुढचा प्रश्नच नाही!” लग्नाबद्दल विचारताच तेजश्री प्रधानची मजेशीर प्रतिक्रिया; डेस्टिनेशन वेडिंगवरही व्यक्त केलं मत

सोशल मीडियावर आधीच या प्रोमोला भरभरून प्रतिसाद मिळत असून “फायनली”, “मोस्ट अवेटेड मोमेंट”, “ईश्वरी- ASR फॉरेवर” अशा प्रतिक्रिया ट्रेंड होताना दिसत आहेत. स्पष्टच आहे की  ही रे माझा मितवा ही कथा आता प्रेमाच्या नव्या अध्यायात प्रवेश करत आहे आणि चाहत्यांना याची प्रचंड आतुरता आहे.

हे पण वाचा.. ठरलं तर मग’मध्ये नवा खळबळजनक ट्विस्ट! अस्मिताच्या नवऱ्याची एंट्री, साक्षीच्या जाळ्यात अडकणार?

tu hi re maza mitwa ishwari arnav love new turn