ketaki kulkarni speaks on negative role in kamli : मराठीवरील लोकप्रिय मालिका कमळीमधील अनिका हे पात्र साकारत असलेली अभिनेत्री Ketaki Kulkarni सध्या चर्चेत आहे. मालिकेत ती नकारात्मक भूमिकेत दिसत असली, तरी खऱ्या आयुष्यात ती तशी अजिबात नाही, हे स्पष्ट करत तिने मनातील भावना उघड केल्या. काही प्रेक्षकांकडून सोशल मीडियावर येणाऱ्या टीकेमुळे ती दुखावल्याचंही तिने सांगितलं.
लहान वयापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेली Ketaki Kulkarni अनेक मालिकांमध्ये झळकली आहे. सध्या कमळीमध्ये ती अनिका म्हणून कमळीच्या आयुष्यात गोंधळ निर्माण करणारी, सतत कारस्थानं करणारी मुलगी म्हणून प्रेक्षकांना दिसते. भूमिकेतील तिचा रागीट आणि उद्धट स्वभाव पाहून काही जण तिला वास्तवातही तशीच समजाे त, आणि यावरून अनेकदा नकारात्मक कमेंट्स करतात.
अलीकडेच Ketaki Kulkarniने ‘राजश्री मराठी’ या प्लॅटफॉर्मला आई-वडिलांसह मुलाखत दिली. यात तिने स्वतःच्या स्वभावाबद्दल बोलताना सांगितलं की ती अत्यंत भावूक असून, आनंद वा दुःख मोठ्या प्रमाणात व्यक्त करणारी आहे. वडिलांनी तिला “गोड” म्हटल्यावर ती हसून म्हणाली की, “बाबांनी सांगितलं म्हणजे ते खरंच आहे.” त्याच वेळी तिने हेही नमूद केलं की मालिकेतली व्यक्तिरेखा आणि तिचं व्यक्तिमत्त्व यात खूप फरक आहे.
टीका करणाऱ्यांना उत्तर देताना ती म्हणाली, “काही लोक पात्रावरून मला प्रत्यक्षातही शिष्ट समजतात. पण मी तशी नाही. मी खूप गोड आणि साधी आहे. भूमिका निभावणं हे माझं काम आहे. एकदा मला भेटलात तर नक्की जाणवेल.” सोशल मीडियावर येणाऱ्या कठोर प्रतिक्रिया तिला कधी-कधी त्रास देतात, आणि “मला वाईट वाटतं,” असं ती मनापासून म्हणाली.
हे पण वाचा.. गोव्यात रंगणार ‘वीण दोघांतली ही तुटेना’चे डेस्टिनेशन वेडिंग; हळदीत होणार गोंधळ, सुश्मितामुळे समर-स्वानंदी अडचणीत?
तिने शेवटी प्रेक्षकांना विनंती केली की, मालिकेतील नकारात्मक पात्र आणि खरा व्यक्ती यामध्ये मोठा फरक असतो. “अनिका ही भूमिका आहे; पण Ketaki Kulkarni ही त्यापेक्षा पूर्णपणे विरुद्ध आहे,” असं सांगून तिने आपली बाजू स्पष्ट केली.
हे पण वाचा.. मी संपणाऱ्यातील नाहीये…” देवमाणूस मालिकेत नवा ट्विस्ट! माधुरीचा खून कोणी केला हे समजताच..









