Omkar Raut Maharashtrachi Hasyajatra : मराठी मनोरंजनविश्वात आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे ओंकार राऊत महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेलं त्याचं नाव आज सर्वांना माहीत आहे. पण या यशामागे एक छोटं पण भावनिक वास्तव दडलं आहे – त्याच्या आईची एकेकाळची भीती.
ओंकार राऊत Onkar Raut Mother हा प्रसिद्ध अभिनेते राजा मयेकर यांचा नातू आहे. सिनेमा, नाटक, टीव्ही आणि आकाशवाणी अशा सर्व माध्यमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या या दिग्गज कलाकाराचा वारसा ओंकारला लाभला आहे. तरीसुद्धा त्याची आई, म्हणजेच राजा मयेकर यांची कन्या, सुरुवातीला ओंकारने अभिनयाच्या क्षेत्रात यावं अशी अजिबात इच्छा नव्हती.
अलीकडेच Sony Marathi वाहिनीचे सीनिअर व्हाइस प्रेसिडेंट आणि अभिनेता अमित फाळके यांच्या ‘एमएचजे अनप्लग्ड’ या पॉडकास्टमध्ये ओंकारने याबाबत खुलासा केला. त्याने सांगितलं की, “आईला नेहमी वाटायचं की मी एका नियमित नोकरीत जावं – सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी ठरलेली वेळ, स्थिर आयुष्य आणि ठरलेली दिनचर्या. कारण तिने आजोबांचे आयुष्य जवळून पाहिलं होतं. नाटकांचे प्रयोग, सततचे प्रवास, घरात येणारे प्रॉप्स आणि सेटचं सामान – हे सगळं पाहून तिच्या मनात अभिनय क्षेत्राविषयी थोडी भीती निर्माण झाली होती.”
ओंकार onkar raut पुढे म्हणतो, “तिला वाटायचं की आता मुलगाही हेच करणार आणि पुन्हा तेच आयुष्य माझ्या वाट्याला येणार. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळं होतं.” आणि खरंच, नियतीने ओंकारला आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत या क्षेत्रात आणलं.
ओंकार राऊतने आपलं करिअर ‘टाइमपास’ या चित्रपटातून सुरू केलं आणि नंतर ‘फ्रेशर्स’, ‘फुलपाखरू’ या मालिकांमधून तो प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. त्यानंतर ‘टाइमपास 3’, ‘चिकी चिकी बुबुम बूम’ सारखे चित्रपट आणि ‘काळे धंदे’ या वेबसीरिजमधूनही त्याने बहुआयामी अभिनय दाखवला. अलीकडेच तो नेटफ्लिक्सवरील ‘इन्स्पेक्टर झेंडे’ या हिंदी चित्रपटात झळकला असून, मराठी आणि हिंदी दोन्ही माध्यमांमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करत आहे.
साधी माणसं स्टार आकाश नलावडेच्या घरात येणार छोटा गेस्ट! बेबी शॉवरचे व्हिडिओ पाहून चाहते भावुक
आज Onkar Raut हा केवळ हास्यजत्रेतील विनोदी कलाकार नाही, तर एक जबाबदार, मेहनती आणि कुटुंबाच्या संस्कारांत वाढलेला कलाकार म्हणून ओळखला जातो. आईच्या भीतीतून सुरू झालेला प्रवास आज अभिमानाचा विषय ठरला आहे – कारण आता तीच आई आपल्या मुलाच्या यशाकडे आनंदाने आणि अभिमानाने पाहते.







