ADVERTISEMENT

वीण दोघातली तुटेना’ चा नवा प्रोमो मल्लिकाचा ‘हुकमाचा एक्का’ काय?

veen doghatli tutena Serial twist wedding drama : वीण दोघातली तुटेना मालिकेत लग्नाची तयारी सुरू असतानाच मल्लिका काकूच्या कारस्थानाने चाहते संतापले आहेत; त्यातच नवीन प्रोमो मध्ये समर-अर्पिताचा संवाद आणि अधिराच्या आयुष्याचा मोठा निर्णय कथेत नवा वळण आणणार.
veen doghatli tutena Serial twist wedding drama

veen doghatli tutena Serial twist wedding drama : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका Veen Doghatli Tutena सध्या प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा शिखर गाठत आहे. मालिकेत लग्नाचा जल्लोष, दोन कुटुंबांची गजबज, आनंदाचे क्षण—सगळं काही रंगात आलेलं असताना अचानक कथेला वेगळाच वळण मिळताना दिसत आहे. कारण,मल्लिका काकू आता काहीतरी मोठा डाव साधण्याच्या तयारीत आहे, असं ताज्या प्रोमोमधून स्पष्ट होतं.

राजवाडे आणि सरपोतदार घराण्यात लग्नसोहळ्याची लगबग सुरू असताना अर्पिता मात्र थोडी चिंताग्रस्त दिसते. प्रोमोमध्ये ती घरातल्या सोफ्यावर विचारमग्न बसलेली असते आणि त्याच वेळी लग्नाच्याच तयारीत धावपळ करणारा समर तिच्यासमोर येतो. “काय ग,अर्पिता तयार नाही झाली अजून ?” असा हलकासा प्रश्न विचारतो  त्यावर अर्पिता मनातील काळजी व्यक्त करते—” नाही कळतंय अधिरा त्या घरात कसं ऍडजेस्ट करणार आहे? काळजी वाटते रे माला तिची

पुढे समर अर्पिता म्हणतो, “हे बघ अधिराला हे सगळं पटायचं असतं ना आधीच पटलं असतं आता लग्नाची वेळ आली आणि प्लीज आता वेळ वाया घालवू नकोस चल उठ”

त्यानंतर अर्पिता आई म्हणजेच मल्लिकाशी मन मोकळं करते. “हे दोघं काहीच ऐकत नाहीत, अधिराचं लग्न खरंच होणार त्या मुलाशी?” असा प्रश्न ती विचारते. त्यावर मल्लिका —“नो वे… अजून माझा हुकमाचा ऐका बाकी आहे.”

हे पण वाचा.. २५ years of Passion! मराठी अभिनेता ‘सुबोध भावे’चा दमदार प्रवास म्हणाला..

या एका वाक्याने सोशल मीडियावर प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली आहे. वीण दोघातली तुटेना च्या कथेत आता काय घडणार? मल्लिका काकू नेमका कोणता डाव खेळणार? समर स्वानंदीच्या आयुष्यात पुन्हा वादळ येणार का? आगामी भागांमध्ये या प्रश्नांची उत्तरं मिळणार असून, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हे पण वाचा.. दिवाळीतच आजारपणाचा फटका! जुई गडकरी टायफॉईडने त्रस्त; चाहत्यांनी व्यक्त केली काळजी

veen doghatli tutena Serial twist wedding drama