Tejashri Pradhan New beginning : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्या अभिनयाचा ठसा छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत उमटलेला आहे. ‘होणार सून मी या घरची’, ‘अग्गबाई सासूबाई’, ‘प्रेमाची गोष्ट’ अशा मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी ही अभिनेत्री सध्या झी मराठीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत स्वानंदीच्या भूमिकेत झळकत आहे. मालिकेत तिच्या नैसर्गिक अभिनयामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
आता तेजश्री प्रधान पुन्हा एका नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना खास गुड न्यूज दिली आहे. या व्हिडीओमध्ये ती एका दिग्दर्शकाशी संवाद साधताना दिसते, जिथे नवीन सीनची तयारी सुरू असल्याचे दिसते. त्या सोबतच तिने “New Beginning”, “Web Series”, “Work Mode On” असे हॅशटॅग वापरत तिच्या नव्या प्रोजेक्टचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता ती मालिकांनंतर आणि चित्रपटांनंतर वेब सीरिजच्या दुनियेत पदार्पण करणार असल्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे.

तथापि, ही वेब सीरिज मराठी आहे की हिंदी, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच या सीरिजचे नाव, तिची भूमिका आणि कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर ती प्रदर्शित होणार आहे, याबाबतही उत्सुकता कायम आहे. चाहत्यांना मात्र तिच्या या नव्या कामाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे आणि ती नेमकी कोणत्या रूपात झळकते हे पाहण्याची आतुरता सर्वांनाच लागली आहे.
सध्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये समर व स्वानंदीच्या लग्नाच्या तयारीने मालिकेत रंगत आली आहे. तेजश्री आणि सुबोध भावे यांची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.
ठरलं तर मग फेम प्रियांका तेंडोलकरचं आलिशान नवीन घर पाहिलंत का? सुंदर देव्हारा खास इंटिरिअरवर
तेजश्री प्रधानने नेहमीच तिच्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता तिच्या या नव्या वेब सीरिजमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत येईल, यात शंका नाही. तिच्या या नव्या सुरुवातीसाठी चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत, आणि लवकरच या प्रोजेक्टचा अधिकृत तपशील समोर येईल अशी सर्वांना अपेक्षा आहे.









