Lagna Nantar Hoilach Prem new twist : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ सध्या प्रेक्षकांना दिवाळीच्या सणासोबत मोठा नाट्यमय ट्विस्ट दाखवणार आहे. देशमुख कुटुंबात दिवाळीचा आनंद ओसंडून वाहत असताना, एका पाहुण्याच्या आगमनाने घरातच तणावाचे वातावरण निर्माण होणार आहे.
मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये मानिनीची मैत्रीण सुनीता देशमुखांच्या घरी येताना दिसते. घराच्या सजावटीचं कौतुक करत ती म्हणते, “घर किती सुंदर उजळवलंयस मानिनी.” त्यावर मानिनी हसत उत्तर देते, “माझ्या लक्ष्मीने उजळवलंय हे घर,” आणि त्या क्षणी काव्याकडे प्रेमळ नजरेने पाहते. पण लगेचच सुनीता म्हणते, “याच लक्ष्मीने काय दिवे लावलेत तेही बघ.” आणि याच वाक्याने पुढील नाट्यमय प्रसंगाची सुरुवात होते.
सुनीता आपल्या हातातील पेन ड्राइव्ह मानिनीसमोर ठेवते. त्या ड्राइव्हमध्ये ती जीव आणि काव्या यांच्या कॅफेमधील सीसीटीव्ही फुटेज असल्याचं सांगते. “आता तूच बघून ठरव, कोण खरंय आणि कोण लक्ष्मी,” असं म्हणत ती देशमुख कुटुंबासमोर मोठं गुपित उघड करण्याचा प्रयत्न करते.
या क्षणी घरात मानिनी, विक्रम, सुनीता आणि काव्या हे चारच जण असतात. त्यामुळे पुढे काय घडणार, याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या व्हिडिओमुळे जीवा आणि काव्याचा भूतकाळ सर्वांसमोर येणार का, की फक्त मानिनी आणि विक्रमलाच हे सत्य समजणार, हा मोठा प्रश्न आहे.
सोशल मीडियावर चाहत्यांनीही या प्रोमोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आता सगळं सुरळीत होत असताना ही का आली?”, “या काकूंना दुसऱ्यांच्या आयुष्यात नाक खुपसायला फार आवडतं,” अशा कमेंट्स प्रेक्षकांनी लिहिल्या आहेत. दिवाळीच्या सणात देशमुख कुटुंबात आनंदाऐवजी गोंधळाचं वादळ उठणार असल्याचं स्पष्ट दिसतंय. पुढील भागात नेमकं काय घडणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनी ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका स्टार प्रवाहवर संध्याकाळी ७ वाजता पाहणं चुकवू नये.
अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेकडून चाहत्यांसाठी सरप्राईज? व्लॉगमधून दिली गुडन्यूज– “थोड्याच दिवसांत…









