prasad jawade amruta deshmukh real love story : मराठी मनोरंजनविश्वातील चर्चेत असलेले जोडपे प्रसाद जवादे अमृता देशमुख पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या जोडीने त्यांच्या प्रेमप्रवासाचा गोड खुलासा केला आहे. ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमध्ये एकत्र आलेल्या या दोघांमध्ये फुललेलं नातं आज विवाहबंधनात अडकलेलं आहे. मात्र या प्रवासात अनेक भावनिक क्षण, संभ्रम आणि निर्णय दडलेले होते.
प्रसाद जवादे सध्या झी मराठीवरील ‘पारू’ मालिकेत मुख्य भूमिका साकारत असून, अमृता देशमुख रंगभूमीवर विविध नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दोघांनी अलीकडेच ‘अनुरूप विवाह संस्था’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या नात्याची सुरुवात, लिव्ह इनचा टप्पा आणि लग्नापर्यंतचा प्रवास सांगितला.
प्रसादने खुलासा करताना सांगितलं की, “बिग बॉसच्या घरात पहिल्याच आठवड्यात मी अमृताला समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. हळूहळू ती आवडायला लागली, पण ती माझा मित्र अभिषेकची बहीण असल्याने मी पुढाकार घेण्यास थोडा संकोचलो. मित्राच्या बहिणीकडे आकर्षण दाखवणं चुकीचं वाटेल असं वाटत होतं.”
तो पुढे म्हणाला, “अमृता मात्र शोमध्ये माझी साथ देत होती. तिचा पाठिंबा जाणवला आणि तेव्हाच कळलं की हे काहीतरी वेगळं आहे. मात्र तिने स्पष्ट सांगितलं होतं की, ‘शोमध्ये काही कमिट करणार नाही.’ हेच योग्य ठरलं, कारण आम्ही बाहेर आल्यावरच एकमेकांना ओळखू लागलो.”
शो संपल्यानंतर प्रसादने अमृताला पहिला मेसेज केला, त्यानंतर दोघे भेटले आणि काही दिवसांतच त्यांच्या नात्याला अधिक गोड वळण मिळालं. प्रसाद सांगतो, “डेटवर गेल्यानंतर आमचं नातं अधिक घट्ट झालं. नंतर आम्ही लिव्ह इनमध्ये राहायचं ठरवलं.”
अमृतानेही यावेळी सांगितलं, “कधी कधी प्रसादचा स्वभाव मला पटत नसे, पण आतून असं वाटायचं की त्याला एक संधी द्यावी. त्याच्या प्रामाणिकपणामुळे माझा त्याच्यावर विश्वास बसला.”
लिव्ह इनमध्ये राहण्याच्या त्यांच्या निर्णयावर कुटुंबीयांनी मात्र सल्ला दिला की, “पहिल्यांदा साखरपुडा करा आणि मग राहायला जा.” त्यामुळे दोघांनी अगदी साध्या पद्धतीने साखरपुडा केला. नंतर मात्र लग्न पारंपरिक पद्धतीने आणि थाटामाटात पार पडलं.
हे पण वाचा.. “लक्ष्मी निवास” मालिकेचा हृदयस्पर्शी प्रोमो ; जान्हवीच्या जाण्याचं सत्य लक्ष्मी स्वीकारेल का?
आज प्रसाद जवादे अमृता देशमुख हे मराठी इंडस्ट्रीतील सर्वात आवडतं कपल मानलं जातं. दोघांच्या स्पष्ट आणि वास्तववादी विचारसरणीमुळे चाहत्यांच्या मनात त्यांचं विशेष स्थान निर्माण झालं आहे. त्यांच्या प्रेमकहाणीचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
हे पण वाचा.. शिवसेना नेत्याची सून ठरणार अभिनेत्री तेजस्विनी लोणारी! थाटामाटात पार पडला साखरपुडा









