anuja sathe new home diwali celebration : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, चैतन्य आणि नवीन सुरुवातींचं प्रतीक. या सणानिमित्त अनेकजण नवीन वस्तू खरेदी करून आपला आनंद द्विगुणित करतात. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अनुजा साठे (Anuja Sathe) हिनं यंदा दिवाळी अधिक खास बनवली आहे. अभिनेत्रीने मुंबईत स्वतःचं स्वप्नवत घर खरेदी करत नवा टप्पा गाठला आहे.
अनुजा साठे ही गेल्या काही वर्षांत मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वात आपली वेगळी छाप पाडणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मालिकांपासून वेबसीरिज, चित्रपट आणि रंगभूमीपर्यंत तिचा वावर तितकाच प्रभावी राहिला आहे. अभिनयात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अनुजाने आता आयुष्यातील आणखी एक मोठं स्वप्न पूर्ण केलं आहे.
सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असणाऱ्या अनुजाने नुकतंच तिच्या इंस्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. त्या छायाचित्रांमध्ये ती तिच्या नव्या घरात प्रवेश करताना दिसत आहे. गृहप्रवेशाच्या त्या क्षणांचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवतो. “October just got better, Happy Diwali…” असं कॅप्शन देत तिने हा आनंदाचा क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
मुंबईच्या गजबजलेल्या भागात असलेलं अनुजाचं हे घर १४व्या मजल्यावर आहे. आलिशान सजावट, उजळ वातावरण आणि शांत परिसर अशा सुंदर घराची झलक पाहून तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री मयुरी देशमुख, तेजस बर्वे आणि इतर अनेक कलाकारांनी कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे.
दिवाळीसारख्या शुभ पर्वावर घर घेणं ही अनेकांची स्वप्नपूर्ती असते. अनुजाने ते स्वप्न पूर्ण करून चाहत्यांना प्रेरणा दिली आहे. मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास या जोरावर प्रत्येक गोष्ट शक्य आहे, हे अनुजाने आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे.
हे पण वाचा.. भाऊबीजेच्या दिवशी शशांक केतकरने दाखवला लेकीचा चेहरा; राधाच्या क्यूट स्माईलने जिंकली सगळ्यांची मनं
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर अनुजा साठे ही अभिनेता सौरभ गोखलेची पत्नी आहे. २०१३ साली दोघांनी लग्नगाठ बांधली. तिने ‘लगोरी’, ‘एक थी बेगम’, ‘पेशवा बाजीराव’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये अभिनय केला आहे. तसेच ‘परमाणु – द स्टोरी ऑफ पोखरण’ या हिंदी चित्रपटात तिची दमदार भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती.
सध्या ती नवीन प्रोजेक्ट्सच्या तयारीत असून, नव्या घरातल्या या खास दिवाळीमुळे तिच्या आयुष्यात आनंदाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
हे पण वाचा.. त्या चर्चा खर्या ठरल्या का? एकटीनेच साजरी केली दिवाळी ऐश्वर्या शर्मा पती नीलपासून दुरावल्याच्या चर्चांनी घेतला वेग!









