ADVERTISEMENT

महिपतचा प्लॅन साक्षीला बाहेर काढण्यासाठी खोटी साक्षी मरणार Tharala Tar Mag 16 October

‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag 16 October) मालिकेच्या आजच्या भागात पुन्हा एकदा नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. प्रियाच्या खऱ्या आई-वडिलांच्या आगमनाने घरातील वातावरण तापले आहे, तर दुसरीकडे महिपतने तिला तुरुंगातून सोडवण्यासाठी नवा प्लॅन आखला आहे.
Tharala Tar Mag 16 October

Tharala Tar Mag 16 October ‘ठरलं तर मग’ मालिकेत रोज काही ना काही नवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. आजच्या (16 ऑक्टोबर) भागात मात्र प्रेक्षकांना प्रिया, तिचे खरे आई-वडील आणि अर्जुन-सायली यांच्या नात्याभोवती फिरणारं एक तुफान नाट्य पाहायला मिळतंय.

अर्जुनने सर्व अडथळे पार करत आपल्या खऱ्या आई-वडिलांना घरी आणलं आणि त्यावरून प्रियाचा पारा चढलेला असतो. तिचा संशय पुन्हा एकदा नागराज आणि महिपतवरच थांबतो. अर्जुनचं हे पाऊल त्यांच्या डावाचा भाग असल्याची तिला खात्री वाटते. पण सायली मात्र आपल्या सासू-सासऱ्यांच्या स्वागतात कुठेही कमी पडत नाही. ती त्यांच्या आवडीनिवडींची काळजी घेते आणि आपुलकीने वागते. मात्र मिस्टर आणि मिसेस लोखंडे या नव्या श्रीमंतीने थोडे गोंधळलेले असतात.

सायलीने प्रेमाने दिलेल्या चहाऐवजी ते थंड सरबत मागतात, आणि सुभेदार त्यांचं कौतुकाने निरीक्षण करत राहतात. एवढ्यात प्रियाची आई तिला ओळखते. ती सांगते की हीच ती मुलगी जी काही दिवसांपूर्वी तिच्या दुकानात आली होती आणि विनाकारण तिचा वेळ वाया घालवून गेली होती. प्रियाला हे ऐकून धक्का बसतो. ती आधी नाकारते, पण नंतर कबूल करते की ती दिवाळीसाठी ड्रेस शिवायला गेली होती. मात्र दुकान पाहून तिला योग्य वाटलं नाही म्हणून ती परत आली. या छोट्याशा कारणावरूनच प्रियाचे वडील तिच्यावर संतापतात आणि वाद रंगतो. अर्जुन त्यांना शांत करतो आणि कल्पना त्यांना त्यांच्या खोलीत नेते.

दरम्यान, महिपतचा मेंदू मात्र वेगळाच खेळ आखत असतो. आपल्या लेकीला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी त्याने नवा मोहरा तयार केलेला असतो. तुरुंगातील एका आरोपीला तो पैसे देऊन विकत घेतो आणि सांगतो की काहीही झालं तरी माझी मुलगी बाहेर आलीच पाहिजे. त्याची मुलगी साक्षी या सगळ्याचं कारण विचारते, पण महिपत काही उघड करत नाही. त्याचा संपूर्ण प्लॅन गुप्तच ठेवतो.

थोड्याच वेळात महिपतला नागराज भेटायला येतो आणि दोघं मिळून प्रियाला फोन लावतात. फोनवरून नागराज तिला टोमणे मारतो. भीतीने गप्प असलेली प्रिया अखेरीस ठामपणे उत्तर देते — “मी फिनिक्स पक्ष्यासारखी आहे, राखेतून पुन्हा उभी राहीन.” तिचा निर्धार ऐकून नागराज तिला धमकी देतो की तिचे खरे आई-वडील आता तिच्याच घरात राहतात, त्यामुळे ती संकटात आहे. तो तिला सांगतो की तू आमच्याविरोधात जो व्हिडिओ तयार केला आहेस, तो नष्ट कर, अन्यथा परिणाम भोगावे लागतील. पण प्रियाने नकार देत तिचं ठाम मत मांडलं. Tharala Tar Mag 16 October Full Episode

या सर्व गोंधळात अर्जुन आणि सायली मात्र त्यांच्या छोट्या जगात रमलेले असतात. सायलीच्या आनंदाला पारावार नसतो. तिचा नवरा तिच्या कुटुंबाला स्वतःचं म्हणून स्वीकारतोय, हे तिच्यासाठी मोठं समाधान असतं. त्या आनंदात ती अर्जुनला किस करते, आणि त्या दोघांच्या नात्यात पुन्हा गोडवा वाढताना दिसतो. बाहेरून हे सगळं पाहणारी प्रिया मात्र पुन्हा काहीतरी शिजवत असते. तिच्या मनात संशय वाढतो की आता सगळ्यांना तिचं गुपित समजेल आणि परिस्थिती तिच्या विरोधात जाईल. त्यामुळे ती लगेच काहीतरी कारवाई करायचं ठरवते.

नितीन गडकरींशी संकर्षण कऱ्हाडेची खास भेट; पुस्तकाची भेटवस्तू मिळताच अभिनेत्याने व्यक्त केला आनंद

दरम्यान, प्रियाचे खरे आई-वडील त्यांच्या खोलीत शांत बसलेले असतात. एवढ्या ऐशोआरामाची त्यांना सवय नसल्याने ते थोडे अस्वस्थ असतात. सायली त्यांच्यासाठी चादर घेऊन येते आणि त्यांच्या सेवेत मग्न होते. मिस्टर आणि मिसेस लोखंडे तिच्या प्रेमळ वागण्याने भारावून जातात आणि तिला आपली मुलगी समजतात. सायलीही त्यांच्याशी भावनिक होत म्हणते, “मी खूप वर्षांपासून तुमचं येणं वाट पाहत होते, आज तो दिवस आला.” ती त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते आणि तेवढ्यात कल्पना आत येते. कल्पना त्यांचे आभार मानते आणि म्हणते, “तुम्ही अशी गोड मुलगी जन्माला घातली, जी आज आमचं घर बांधून ठेवते.”