ADVERTISEMENT

rupali bhosale marriage “मला स्वयंवरात रस नाही…” ‘लपंडाव’ फेम रुपाली भोसलेची स्पष्ट भूमिका, म्हणाली – “परीक्षा घेणं योग्य नाही”

rupali bhosale marriage : मराठी मालिकाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री Rupali Bhosle पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या ती लोकप्रिय ‘लपंडाव’ मालिकेत सरकार हे प्रभावी पात्र साकारत आहे. मालिकेतील सखी या पात्राचं स्वयंवर सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत असून त्यावर रुपालीने दिलेली खरीखुरी प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

रुपालीने एका खास मुलाखतीत सांगितले की तिला स्वयंवरासारख्या कार्यक्रमात सहभागी होण्याची अजिबात इच्छा नाही. “मला स्वयंवर वगैरे करायचं नाही. माझ्याकडे तसं संयमच नाही. आणि खरं सांगायचं तर, एखाद्याची परीक्षा घेणं मला पटत नाही,” असं ती ठामपणे म्हणाली. तिच्या या वक्तव्यानं चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

ती पुढे म्हणाली, “आपण जर मुलांची परीक्षा घेतली, तर उद्या त्यांनीही मुलीची परीक्षा घेण्याचा विचार केला, तर त्यात कुणाचाही अपमान होतो. स्वतःचा अहंकार दुखावला जातो. म्हणूनच मला असं वाटतं की अशा प्रकारच्या परीक्षा घेणं योग्य नाही.” रुपालीच्या या वक्तव्याला अनेक महिला प्रेक्षकांनीही सोशल मीडियावर पाठिंबा दिला आहे.

अभिनेत्रीने यावेळी एक भावनिक मुद्दाही मांडला. ती म्हणाली, “जितकी भीती मुलींना वाटते, तितकीच मुलांनाही वाटते. कोण अनोळखी व्यक्ती घरात येणार आहे, ती घरच्यांशी कशी वागेल, सगळं सांभाळू शकेल का… याचीही त्यांना काळजी असते. त्यामुळे फक्त एकाच बाजूने कसोटी लावणं योग्य नाही.”

दरम्यान, Rupali Bhosle ही केवळ मराठीच नाही तर हिंदी मालिकांमध्येसुद्धा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहे. ‘लपंडाव’ मालिकेपूर्वी तिने ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत संजनाची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवली होती. तिच्या सध्याच्या सरकार या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

हे पण वाचा.. Manache Shlok New Title ‘मना’चे श्लोक’ वादानंतर तू बोल ना नव्या नावाने झळकणार १६ ऑक्टोबरला प्रेक्षकांसमोर

रुपाली भोसलेचं हे स्पष्ट आणि ठाम मत अनेक तरुणींना भावतंय. स्वयंवरासारख्या पारंपरिक प्रथांवर ती ज्या पद्धतीने विचार मांडते आहे, त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये तिच्याबद्दलचं प्रेम आणि आदर आणखी वाढताना दिसतोय. मालिकेतील तिच्या भूमिकेसोबतच, तिच्या प्रामाणिक व्यक्तिमत्त्वाचीही सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

हे पण वाचा.. दिशा परदेशीवर नेटकऱ्याची अश्लील कमेंट; अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर, शेअर केला स्क्रीनशॉट! Disha Pardeshi

rupali bhosale instagram post

Leave a Comment