ADVERTISEMENT

आता संसारही होईल.., ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत स्वानंदी-समरचं लग्न, पण प्रेमाचं काय? Vin Doghatli Hi Tutena

Vin Doghatli Hi Tutena या मालिकेत नवा ट्विस्ट समोर आला आहे. रोहन व अधिराच्या लग्नाआधी त्यानं ठेवलेल्या अटीमुळे स्वानंदी आणि समर लग्नबंधनात अडकणार आहेत. मात्र प्रश्न असा की – ठरवून झालेलं हे लग्न प्रेमाच्या बंधनात परिवर्तित होईल का?
Vin Doghatli Hi Tutena

Vin Doghatli Hi Tutena : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. या मालिकेत नवनवीन वळणं येत असून, आता कथा एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. अधिरा आणि रोहनच्या लग्नाच्या तयारीदरम्यान रोहननं एक अनपेक्षित अट ठेवली – त्याच्या नंदू ताईचं, म्हणजेच स्वानंदीचं लग्न झाल्याशिवाय तो स्वतःचं लग्न करणार नाही.

या अटीमुळे घरात नवा गोंधळ उडाला आणि सर्वांनी स्वानंदीच्या लग्नासाठी योग्य मुलगा शोधायला सुरुवात केली. शेवटी तिचं लग्न प्रतीकसोबत ठरलं. स्वानंदी आणि प्रतीक यांचा साखरपुडा रोहन-अधिराच्या साखरपुड्यासोबतच पार पडणार होता. पण त्या प्रसंगी मालिकेतील खलनायिका मल्लिकानं पुन्हा एकदा गोंधळ घातला. तिनं प्रतीकच्या आईसमोर स्वानंदीचं वय खोटं सांगितल्याचं उघड केलं आणि त्यामुळे साखरपुडा मोडला. स्वानंदीच्या वडिलांनी विनवण्या केल्या, पण प्रतीकचं कुटुंब तयार झालं नाही. या घटनेनं घरात पुन्हा निराशेचं वातावरण निर्माण झालं.

याच वेळी, स्वानंदीचा भाऊ रोहननंही आपला साखरपुडा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयानं अधिरा खचली आणि स्वतःलाच इजा पोहोचवली. कुटुंबातील या तणावाच्या काळात, समर आणि स्वानंदी यांनी आपल्या भावंडांच्या सुखासाठी एक वेगळा निर्णय घेतला — एकमेकांशी लग्न करण्याचा. विचार आणि स्वभावाने पूर्णतः भिन्न असलेले हे दोन पात्र आता विवाहबंधनात अडकणार आहेत. Vin Doghatli Hi Tutena New Twist

झी मराठी वाहिनीनं नुकताच ‘वीण दोघांतली ही तुटेना’ चा नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यात समर आणि स्वानंदीच्या लग्नाचे सुंदर क्षण पाहायला मिळतात. लग्नानंतर दोघेही आपल्या खोलीत असताना मनात विचार करतात – “लग्न झालं, मंत्रोच्चार झाले, सगळ्यांच्या मनासारखं झालं… पण प्रेम होईल का?” हे संवाद प्रेक्षकांच्या मनात घर करत आहेत.

प्रोमो पाहिल्यानंतर नेटकरीही उत्साहित झाले असून अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. “लग्नानंतर या दोघांच्या प्रेमाचा प्रवास पाहायला उत्सुक आहोत”, “अशी प्रेमकथा समाजाला प्रेरणा देणारी आहे”, अशा कमेंट्सनी सोशल मीडियावर गर्दी केली आहे. काहींनी निर्मात्यांना विनंती केली आहे की, लग्नानंतर काकूच्या कारस्थानांऐवजी या नव्या नात्याचा प्रवास दाखवावा. Vin Doghatli Hi Tutena full episode

आता मालिकेतील पुढील भागात स्वानंदी आणि समर ठरवून झालेल्या या लग्नाचं नातं किती सुंदर फुलवतायत, हे पाहणं रंजक ठरणार आहे. प्रेक्षकांना एकच प्रश्न सतावत आहे — “संसार तर झाला, पण प्रेमाचं काय?”

“ती फक्त संवाद पाठ करत नाही…” तेजश्री प्रधानबद्दल सुबोध भावे भावूक; ऑनस्क्रीन जोडीवर प्रेक्षक झाले फिदा!