aadish vaidya maalika sodnya mangale karan : छोट्या पडद्यावरील ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर घर करणारी होती. घरगुती नात्यांची गोड कथा, आई-बाबांचे रिटायरमेंटनंतरचे आयुष्य आणि घरातील जबाबदाऱ्या यांचं सुंदर चित्रण या मालिकेत पाहायला मिळत होतं. ही मालिका गतवर्षी २ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आली, मात्र केवळ ९ महिन्यांच्या अल्प कालावधीनंतरच बंद झाली.
या मालिकेत आदिश वैद्य यांनी मकरंद किल्लेदारच्या भूमिकेत उत्कृष्ट अभिनय केला होता. मात्र, अचानकपणे त्यांनी मालिकेतून बाहेर पडल्यामुळे प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले होते. नुकतीच आदिशने ‘सकाळ प्रिमिअर’शी दिलेल्या मुलाखतीत मालिकेतून बाहेर पडण्यामागचे कारण स्पष्ट केले.
आदिशने सांगितले की, “जेव्हा तुम्हाला सेटवर कोणी शिव्या देत असेल, आरडाओरडा करत असेल किंवा अंगावर धावून येत असेल, तेव्हा तुमच्या आत्मसन्मानाचा प्रश्न उद्भवतो. मी कधीही अशा प्रकारचा अनुभव घेतला नव्हतो. माझ्या करिअरमध्ये नेहमीच मला आदराने वागवले गेले, मग ती हिंदी असो किंवा मराठी, नेहमीच प्रेमाने काम केले गेले.”
आदिशने पुढे सांगितले की, “माझ्या स्वभावानुसार मी कायम दुसऱ्यांचा आदर करतो आणि माझ्यापासूनही तसे अपेक्षित असते. त्या वेळेस माझ्या एकावेळी दोन शो चालू होते, त्यामुळे सेटवर वेळेवर पोहोचणे कधी कधी कठीण होत असे. मात्र, प्रोडक्शनमधील एका व्यक्तीने या गोष्टींवर ताण आणला आणि वाद निर्माण झाला. माझे म्हणणे होते की, माझ्या कामाच्या टर्म्सवर मला सात दिवस काम करता यावे.”
या सर्व गोष्टींमध्ये सर्वात मोठा धक्का आदिशला त्यावेळी बसला, जेव्हा त्यांच्या वडिलांचा आरोग्य गंभीर अवस्थेत होता. “माझे वडील लीलावती हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल कंडिशनमध्ये होते. मी त्यांना तीन तास भेटण्यासाठी वेळ दिला होता, मात्र सेटवर कोणीही माझी बाजू घेतली नाही. उलट माझ्या शांत न राहण्यावर टीका झाली. त्यामुळे मला मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला,” असे आदिशने स्पष्ट केले.
हे पण वाचा.. २५ वर्षांनंतर मूळ गावी परतली शुबांगी अत्रे; कुटुंबासोबतच्या खास क्षणांची केली शेअरिंग
आदिश वैद्यने आपल्या प्रामाणिक आणि मनमोकळ्या प्रतिक्रियेने फक्त चाहत्यांनाच नव्हे तर सहकाऱ्यांनाही आश्चर्यचकित केले आहे. त्यांच्या या खुलास्यामुळे ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेच्या अचानक बंद होण्यामागचे खरे कारण समोर आले आहे.
हे पण वाचा.. ‘बिग बॉस’ फेम Sara Khan पुन्हा लग्नबंधनात — चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव!









