ADVERTISEMENT

प्रेमकथेचा फिल्मी ट्विस्ट! मेधा मांजरेकर ठरल्या सुलेखा तळवलकरांच्या लग्नाची सूत्रधार”

sulekha talwalkar ambar talwalkar premkatha : सुलेखा तळवलकर आणि अंबर तळवलकर यांची प्रेमकहाणी ही चित्रपटासारखी गोड आणि हटके आहे. लहानपणापासून ओळख असलेल्या या जोडीचं लग्न जमवण्यात मेधा मांजरेकर यांची महत्त्वाची भूमिका होती. ‘आम्ही सारे खवय्ये’ कार्यक्रमात दोघांनी आपल्या प्रेमकथेच्या गमतीशीर आठवणी शेअर केल्या.
sulekha talwalkar ambar talwalkar premkatha

sulekha talwalkar ambar talwalkar premkatha : मराठी चित्रपट आणि मालिकांमधील गोड चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Sulekha Talwalkar यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. सध्या त्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. नुकतेच सुलेखा आणि त्यांचे पती अंबर तळवलकर यांनी ‘Aamhi Sare Khavayye’ या लोकप्रिय कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी दोघांनी त्यांच्या प्रेमकथेतील काही गमतीदार किस्से प्रेक्षकांसमोर उलगडले.

सुलेखा आणि अंबर यांची ओळख ही अगदी लहानपणापासूनची. अंबर यांनी केवळ १७ वर्षांचे असतानाच सुलेखाशी लग्न करण्याचा निर्धार केला होता. कार्यक्रमात बोलताना अंबर म्हणाले, “मी पहिल्यांदा तिला पाहिलं, तेव्हाच मला ती आवडली. त्यावेळीच मनात ठरवलं की हीच माझी जोडीदार असणार.” अंबर यांनी पहिल्यांदा प्रपोज केलं तेव्हा सुलेखाने त्यांना तब्बल सहा-सात महिने वाट पाहायला लावली होती. त्यावर हसत सुलेखा म्हणाल्या, “ते मुद्दाम नव्हतं, त्या काळी आम्ही दोघंही खूप लहान होतो.”

प्रेमकथेतील एक किस्सा सांगताना सुलेखा म्हणाल्या, “अंबरची आई – स्मिता तळवलकर त्या वेळी अमेरिकेत बॉस्टनमध्ये दौऱ्यावर होत्या. अंबरनं त्यांना फोन करून सांगितलं की, तो एका मुलीच्या प्रेमात पडलाय आणि लग्न करणार आहे. त्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती, ते तो आजही टेलिव्हिजनवर सांगू शकत नाही.”

सुलेखाच्या अभिनय कारकिर्दीतील पहिला चित्रपट होता ‘Mazi Aai’. या चित्रपटात त्यांनी आणि Medha Manjrekar यांनी एकत्र काम केलं होतं. योगायोगाने मेधा मांजरेकर अंबरच्या नातेवाईक असल्याने अंबर वारंवार सेटवर यायचा, सोडायचा आणि तिथेच थांबायचा. सुलेखाला तेव्हा वाटायचं की अंबर आणि मेधावहिनींमध्ये खूप जवळीक आहे, पण नंतर समजलं की हे सगळं तिच्यासाठीच होतं. अखेरीस मेधा मांजरेकर यांनीच या दोघांचं लग्न जमवलं.

त्या काळात मोबाईल फोन सर्वांसाठी सहज उपलब्ध नव्हते. सुलेखा पेजर वापरत असत. अंबर म्हणाले, “मी तिला पेज केलं की फोन करायला तिला सेटपासून खूप दूर जावं लागायचं. शेवटी वैतागून मीच तिला एक महागडा मोबाईल गिफ्ट केला.” त्यांच्या या गोड आठवणींवर कार्यक्रमात उपस्थित सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.

हे पण वाचा.. आईच्या आजारपणाशी झुंजत ‘श्रावणबाळ’ ठरला प्रसाद जवादे; पुरस्कार सोहळ्यात अश्रू अनावर, अमृता देशमुखने सांगितली भावनिक गोष्ट

आजही ही जोडी चाहत्यांची आवडती आहे. अंबर आणि Sulekha Talwalkar यांचं नातं हे केवळ प्रेमकथा नसून, एक गोड आठवण बनून राहिलं आहे. त्यांचं एकमेकांप्रतीचं प्रेम आणि आदर आजच्या तरुण पिढीसाठी एक प्रेरणा आहे.

हे पण वाचा.. Bigg Boss 19 Pranit More : अंकिता वालावलकरची पोस्ट चर्चेत, म्हणाली – “हा सगळा एडिटिंगचा खेळ

sulekha talwalkar ambar talwalkar premkatha