ADVERTISEMENT

सावळ्याची जणू सावली फेम प्राप्ती रेडकरचा खुलासा “मी किकबॉक्सर असूनही सावलीमुळे Prapti Redkar Savlyachi Janu Savali

Prapti Redkar ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने तिच्या भूमिकेबद्दल खास खुलासा केला आहे. ती म्हणाली की, सावलीचे पात्र साकारताना ती विठ्ठलभक्तीशी जवळून जोडली गेली आणि तिच्या व्यक्तिमत्त्वातही सकारात्मक बदल झाले.
Prapti Redkar Savlyachi Janu Savali

Prapti Redkar : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘सावळ्याची जणू सावली’ सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने आपल्या अभिनयातून वेगळी छाप निर्माण केली आहे. त्यातली ‘सावली’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. या भूमिकेत काम करणारी अभिनेत्री प्राप्ती रेडकर सध्या चर्चेत आली असून तिने तिच्या पात्राबद्दल आणि वैयक्तिक अनुभवाबद्दल दिलेला खुलासा चाहत्यांना भावला आहे.

मालिकेत सावली ही साध्या कुटुंबातील मुलगी आहे. तिचा आवाज गोड असूनही तिला स्वतःचे नाव गाजवता आलेले नाही. तिच्या आवाजाचा वापर करून भैरवी वझेने तिच्या मुलगी ताराच्या यशाचा पाया रचला आहे. सावली स्टेजच्या मागे गाणं गाते, तर तारा फक्त ओठ हलवत प्रकाशझोतात राहते. या अन्यायातही सावली विठ्ठलावर अखंड श्रद्धा ठेवते. संकटाच्या काळातही ती विठ्ठलाशी संवाद साधत राहते, आणि तिची भक्ती प्रेक्षकांना भावते.

या सशक्त भूमिकेबद्दल प्राप्ती रेडकरने ( Prapti Redkar Savlyachi Janu Savali) अलीकडेच ‘व्हायफळ’ या झी मराठीच्या पॉडकास्ट सत्रात खास अनुभव शेअर केला. तिच्याकडे विचारण्यात आलं की, सावलीच्या विठ्ठलभक्तीने तिला वैयक्तिक पातळीवर काय शिकवलं? यावर प्राप्तीने सांगितलं की, “मी कोकणातली असल्याने आमच्याकडे गणेशोत्सवाला जास्त महत्त्व असतं. विठ्ठलाशी इतकं नातं कधी जोडलेलं नव्हतं. पण सावलीचं पात्र साकारताना मी विठूरायाच्या अधिक जवळ गेले.”

ती पुढे म्हणाली, “या मालिकेमुळे मला वारीत सहभागी होण्याची संधी मिळाली. तिथल्या भक्तांना, त्यांचा विश्वास आणि प्रेम अनुभवताना मला जाणवलं की श्रद्धा माणसाला खऱ्या अर्थाने मजबूत बनवते.”

प्राप्तीने पुढे एक अनोखा पैलूही उलगडला. ती म्हणाली, “मी प्रत्यक्ष आयुष्यात एक किकबॉक्सर आहे, पण सावलीचं पात्र साकारताना माझ्यात एक वेगळी शांतता आणि संयम आला. या भूमिकेमुळे मी थोडी अधिक संवेदनशील आणि कोमल झाले आहे.”

“ओळखायलाच नाही आलं मला!” — ‘तुला जपणार आहे’ फेम मनोज कोल्हटकर यांचा सेटवरील भन्नाट किस्सा आणि १४ वेळा झालेल्या लूक टेस्टचा खुलासा!

या व्हिडीओमध्ये प्राप्ती Prapti Redkar ‘कानडा राजा पंढरीचा’ या अभंगाच्या ओळी म्हणताना दिसते, आणि त्या क्षणी तिच्या डोळ्यातला भाव तिच्या श्रद्धेचा पुरावा देतो. सावलीसारख्या भावनात्मक भूमिकेमुळे प्राप्ती रेडकरच्या अभिनयाला आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाला नवा आयाम मिळाला आहे, हे नक्की.