कलर्स मराठीवरील प्रेक्षकांची आवडती मालिका ‘पिंगा गं पोरी पिंगा’ Pinga Ga Pori Pinga Serial या मालिकेनं छोट्या पडद्यावर एक मोठा टप्पा गाठला आहे. मालिकेने नुकतेच ३०० भाग पूर्ण केले असून, या यशाचा जल्लोष मालिकेच्या संपूर्ण टीमनं मोठ्या आनंदात साजरा केला. या खास क्षणाचा व्हिडीओ अभिनेत्री कांची शिंदेनं आपल्या सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांनाही या आनंदात सामील केलं आहे.
या सेलिब्रेशनदरम्यान सेटवर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं. मालिकेचं नाव असलेला एक मोठा केक खास बनवण्यात आला होता. मालिकेतील सर्व प्रमुख अभिनेत्री आणि कलाकारांनी एकत्र येत केक कापला आणि एकमेकांचे अभिनंदन केलं. ‘पिंगा गं पोरी पिंगा’ ही मालिका मैत्रीच्या अनोख्या बंधावर आधारित असल्यामुळे, मालिकेबाहेरही या अभिनेत्रींचं एकमेकांशी घट्ट नातं आहे. या सेलिब्रेशनदरम्यान त्या सर्वांनी एकत्र हसतखेळत आनंद व्यक्त केला.
“‘लाखात एक आमचा दादा’ मालिका संपली; अभिनेत्री कोमल मोरे हिची भावुक निरोपपोस्ट चर्चेत!
सध्या मालिकेत कथा अत्यंत उत्कंठावर्धक टप्प्यावर पोहोचली आहे. अण्णा केदारनं प्रेरणाचं अपहरण केल्यामुळे ‘पिंगा गर्ल्स’ चिंतेत पडल्या आहेत. प्रेरणेला परत आणण्यासाठी त्या आता कोणती योजना आखतात आणि या संकटातून मैत्रिणींचा गट कसा बाहेर पडतो, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे. Pinga Ga Pori Pinga Serial
याच वेळी मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आणखी एक खास आनंदाची बातमी आहे. ‘पिंगा गं पोरी पिंगा’ आणि ‘इंद्रायणी’ या दोन मालिकांचा महासंगम ६ ते ११ ऑक्टोबर दरम्यान कलर्स मराठीवर संध्याकाळी ७ वाजता दाखवला जाणार आहे. या महासंगमासाठी सलग आठ दिवस दिवस-रात्र शूटिंग करण्यात आलं आहे. दोन्ही मालिकांतील कलाकार या विशेष भागांमध्ये एकत्र दिसणार आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांना दुहेरी मजा अनुभवायला मिळणार आहे.
मालिकेत ऐश्वर्या शेटे, आकांक्षा गाडे, शाश्वती पिंपळीकर, प्राजक्ता परब आणि विदिशा म्हसकर या अभिनेत्री प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. या सर्वांनी मिळून ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेला वेगळं स्थान मिळवून दिलं आहे. मालिकेतील मैत्री, संघर्ष आणि भावनांनी भारलेली कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडते, आणि त्यामुळेच ही मालिका आजही प्रेक्षकांच्या पसंतीत कायम आहे. Pinga Ga Pori Pinga Serial
३०० भागांचा टप्पा गाठत ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेनं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, चांगल्या कथा आणि उत्कृष्ट अभिनय नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण करतात. आता या मालिकेच्या पुढील प्रवासाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेलं आहे.









