Tharala Tar Mag 30 September : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ दिवसेंदिवस अधिकच रोचक होत चालली आहे. मालिकेत दररोज नवे वळण येत असल्याने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 30 सप्टेंबरच्या भागात मालिकेचा केंद्रबिंदू ठरणार आहे सुभेदार कुटुंबातील प्रिया आणि तिच्या लपलेल्या भूतकाळाचा. सायली-अर्जुन या दोघांच्या आयुष्यातील गुंतागुंत आता अधिक गडद होताना दिसत आहे.
एपिसोडच्या सुरुवातीला सायली अर्जुनच्या सोबत स्वतःच्या भूतकाळाचा शोध घेण्याचा निर्णय घेते. दरम्यान, प्रिया आपल्या खोलीत काहीतरी शोधत असताना गडबडीत तिच्या हातून एक वस्तू खाली पडते. तिचा आवाज थेट सायली आणि अर्जुनपर्यंत पोहोचतो. घाबरलेल्या प्रियाला संशय येतो की आता दोघे तिच्या मागावर येतील. त्या भीतीने ती थेट कपाटात लपून बसते.
सायली आणि अर्जुन जेव्हा खोलीत पोहोचतात, तेव्हा खोली अस्ताव्यस्त पडलेली पाहून त्यांना सुरुवातीला चोर घुसल्याचा भास होतो. पण पुढच्याच क्षणी सायलीच्या नजरेस प्रियाची ओढणी कपाटाबाहेर डोकावताना दिसते. दोघेही युक्तीने मोठ्याने आवाज करून बाहेर निघाल्याचे भासवतात. तेवढ्यात कपाटातून बाहेर आलेली प्रिया रंगेहात पकडली जाते.
सायली तिला थेट सवाल करते की ती घरात काय करायला आली आहे. त्यावर प्रिया अवघडलेल्या स्वरात सांगते की हे देखील माझं घरच आहे. मात्र तिची उत्तरं उडवा-उडवीची असल्याने अर्जुनच्या लक्षात येतं की प्रिया प्रत्यक्षात एका खास गाठोड्याच्या शोधात आहे. अर्जुन स्पष्ट सांगतो की तिला जे हवं होतं ते कधीच सापडणार नाही, कारण तिचं खोटं त्याला आता कळून चुकलं आहे. प्रिया काहीच न समजल्याचा बहाणा करून निघून जाते.
यानंतर सायली अर्जुनला विचारते की प्रिया खोलीत नेमकं काय शोधत होती आणि तुम्ही कोणत्या सत्याबद्दल बोलत आहात. अर्जुन तिला गाठोड्याचं रहस्य सांगतो. त्यानुसार मधुभावांनी आश्रमातील दोन गाठोड्यांची जबाबदारी घेतली होती, त्यापैकी एक प्रियाकडे सापडलं तर दुसरं गायब झालं. अर्जुनने सीनियरच्या घरातही शोध घेतला पण तेथेही काही हात लागलं नाही. ते गाठोडं सायलीचं असल्याचं समोर आल्यानंतर तिच्या डोळ्यासमोर भूतकाळातील आठवणी उभ्या राहतात.
दुसरीकडे महिपत पाटील प्रियाच्या भूतकाळाचा शोध लावण्यासाठी हवालदारावर दबाव टाकतो. त्याला हवेहवेसे काहीही करून त्या स्त्रीबद्दलची माहिती मिळवायची आहे. पाटील हवालदाराकडून कामात उशीर होत असल्याने संतापतो आणि धमकीही देतो.
दरम्यान, प्रिया घरी परतल्यानंतरही संतापलेल्या अवस्थेत असते. त्याचवेळी नागराज तेथे दाखल होतो. प्रियाला संशय येतो की गाठोडं नागराजने चोरलं असावं. मात्र नागराज सरळ बोलून टाकतो की ना त्याने ना महिपतने तिचं गाठोडं घेतलेलं नाही. उलट तिला इशारा देतो की तिची दादागिरी आता थांबवली जाणार आहे, तिच्या खेळाचा शेवट करायची त्यांची तयारी पूर्ण आहे. नागराजच्या शब्दांमुळे प्रिया मनातल्या मनात घाबरते, पण गाठोड्याचं रहस्य तिला अजूनही समजत नाही.
सायली-अर्जुन यांच्यातील संवाद मात्र अधिक हळवे आणि भावनिक ठरतात. सायली अर्जुनला सांगते की तिच्या मनात अजूनही भूतकाळाविषयी भीती आहे, जी दूर करण्यासाठी त्याची मदत आवश्यक आहे. पूर्वी तिला गाडीत बसण्याचीही भीती वाटायची, पण अर्जुनमुळे ती हळूहळू कमी झाली. आता उरलेल्या भीतीवर मात करण्यासाठी तिला पुन्हा त्याचा आधार हवा आहे. अर्जुनही तिला साथ देण्याचं मान्य करतो.
अशा प्रकारे ‘ठरलं तर मग 30 September’ चा एपिसोड रहस्य, थरार आणि भावनांनी भरलेला ठरतो. प्रिया आणि सायलीच्या भूतकाळातील गाठोड्याचे रहस्य अजून किती गूढ उलगडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने पुढील भागाची वाट पाहत आहेत.









