ADVERTISEMENT

बिग बॉस 19 मधून आवेज दरबारची अचानक एक्झिट; कुटुंबानेच पैसे देऊन काढलं बाहेर? Awez Darbar Bigg Boss 19

Awez Darbar Bigg Boss 19 मधून लोकप्रिय कोरिओग्राफर आणि इन्फ्लुएन्सर Awez Darbar अचानक बाहेर पडला आहे. अधिकृत कारण कमी मतं असल्याचं सांगितलं गेलं असलं तरी, त्याच्या कुटुंबानेच पैशांच्या बदल्यात त्याला शोमधून बाहेर काढल्याची चर्चा रंगते आहे.
Awez Darbar Bigg Boss 19

टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो Bigg Boss 19 नेहमीच चर्चेत असतो. या सीझनमध्ये आधीपासूनच प्रेक्षकांना अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले आहेत. मात्र, पाचव्या आठवड्यात घडलेली एक घटना चाहत्यांसाठी अनपेक्षित ठरली. कोरिओग्राफर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर Awez Darbar Bigg Boss 19 मधून अचानक बाहेर पडला. या एलिमिनेशननंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

शनिवारच्या वीकेंड का वार भागात अभिनेत्री गौहर खान घरात आली होती. तिने आवेजला त्याचा खेळ अधिक चांगला करण्याच्या सूचना दिल्या. “तुझा खेळ तूच घडवायचा आहे. तू नीट खेळलास नाहीस तर तुला कोणी वोट देणार नाही आणि बाहेर पडशील,” असे ती म्हणाली होती. आश्चर्य म्हणजे त्यानंतरच्या दिवशीच म्हणजे रविवारी आवेज घराबाहेर गेला. शोचे होस्ट सलमान खान यांनी अधिकृतपणे सांगितले की, कमी मतांमुळे आवेजला बाहेर पडावं लागलं. मात्र, यामागे वेगळीच गोष्ट असल्याची चर्चा रंगत आहे. Awez Darbar Bigg Boss 19

“संकर्षण कऱ्हाडेच्या यशामागचं गुपित; शलाका कर्‍हाडे म्हणाल्या – ‘तो खचला होता तेव्हा…’”

काही वृत्तांनुसार, कमी मतं हे कारण नसून आवेजच्या कुटुंबानेच त्याला शोमधून बाहेर घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी निर्मात्यांना पैशांची ऑफर दिल्याचं म्हटलं जात आहे. या चर्चेला आणखी चालना मिळाली कारण शोमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीसाठी आवेजची एक्स गर्लफ्रेंड शुभी जोशीचे नाव पुढे आले होते. ही बातमी समोर आल्यानंतर घरातील इतर स्पर्धक अमाल आणि बसीर यांनी आवेजच्या वैयक्तिक नात्यांवर चर्चा केली होती. यामुळे आवेज भावनिकदृष्ट्या खूप खचला, इतकंच नव्हे तर एका टास्कदरम्यान तो रडतानाही दिसला.

शुभी जोशीनं याआधी एका मुलाखतीत आवेजसोबत तिचं रिलेशन होतं हे मान्य केलं होतं. यानंतर चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली की, नगमासोबत रिलेशनमध्ये असतानाही आवेजनं शुभीला धोका दिला होता. शोमध्ये शुभी वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊ शकते, अशी माहितीही समोर आली. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याची गोष्ट राष्ट्रीय स्तरावर येईल, या भीतीनं कुटुंबाने त्याला शोमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

जरी या सगळ्या चर्चांनी रंग भरला असला तरी, Bigg Boss 19 चे मेकर्स किंवा आवेज दरबारच्या कुटुंबीयांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे खरी गोष्ट काय हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण एक मात्र नक्की, आवेजची अचानक एक्झिट प्रेक्षकांना नक्कीच खटकली असून, Awez Darbar Bigg Boss 19 हा चर्चेचा विषय ठरला आहे.