ADVERTISEMENT

सायली अर्जुन मिळून शोधणार सायलीचे आई-बाबा, प्रियाची लागणार वाट Tharala Tar Mag 29 September

Tharala Tar Mag 29 September च्या भागात अर्जुन आणि सायलीच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट येतो. अर्जुननं मधु भावाने सांगितलेलं गुपित सायलीसमोर उघड करताच तिच्या आयुष्यात वादळ उठतं, तर दुसरीकडे प्रियाच्या हालचालींनी कथानकाला नवा रंग मिळतो.
Tharala Tar Mag 29 September

Tharala Tar Mag 29 September Update : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग नेहमीच प्रेक्षकांच्या उत्सुकतेला चुणचुणीत ठेवते. प्रत्येक भागात नवनवे ट्विस्ट, नाट्यमय प्रसंग आणि हृदयाला भिडणारे संवाद यामुळे या मालिकेने TRP मध्ये आघाडी कायम ठेवली आहे. आजच्या 29 सप्टेंबरच्या भागात अर्जुन आणि सायली यांच्यात बराच काळानंतर एकांतात झालेली हृदयस्पर्शी संवादांची देवाणघेवाण प्रेक्षकांच्या मनाला भावणारी ठरते. पण त्याचवेळी प्रिया चोरपावलांनी घरात शिरल्याने कथानकाला आणखी रोचक वळण मिळतं.

घरात फक्त अर्जुन आणि सायली उरतात. बाकीचे सर्व कुटुंबीय अस्मिताच्या घरी गेलेले असतात. त्यामुळे अचानक मिळालेल्या या एकांतामुळे दोघंही एकमेकांशी वेगळ्या आठवणींमध्ये रमू लागतात. अर्जुनला वाटतं की हा सगळा डाव मुद्दाम रचला गेला असावा, जेणेकरून त्यांना एकत्र वेळ मिळावा. दोघेही हसतखेळत आपली कौशल्यं दाखवू लागतात. सायली गाणं गाऊन दाखवते, तर अर्जुन बासरी वाजवतो. नंतर जेव्हा सायली स्वतः बासरी वाजवते, तेव्हा तिच्या लहानपणीच्या आश्रमातील आठवणी ताजी होतात. तिला मधु भाऊ, प्रिया आणि कुसुमताई यांच्यासोबतचे क्षण आठवतात.

याचवेळी प्रिया सावधपणे घरात प्रवेश करते. तिला वाटलेलं असतं की घर रिकामं आहे, पण अर्जुन आणि सायली घरात असल्यामुळे तिचा प्लॅन फसतो. ती गुपचूप आपल्या खोलीत जाऊन गाठोड्याचा शोध घेते, पण अर्जुनने ते आधीच सुरक्षित ठिकाणी ठेवल्यामुळे तिला निराशा हात लागते.

दरम्यान, बाहेर नागराज महिपतला भेटतो. प्रियाचं वागणं आता नियंत्रणाबाहेर गेल्याचं तो सांगतो आणि तिचा बंदोबस्त करण्याची मागणी करतो. महिपत त्याला आश्वस्त करतो की प्रियाबाबतची योजना तो आधीच तयार करून बसला आहे. तिच्या भूतकाळातील माहिती उघड करून तो अर्जुनपर्यंत पोहोचवणार असल्याचं महिपत स्पष्ट करतो. प्रियाचे खरे आई-वडील समोर आल्यास तिला गप्प बसवणं सोपं होईल, असा त्याचा प्लॅन असतो.

कथेतील खरा टर्निंग पॉइंट मात्र अर्जुन आणि सायलीच्या संभाषणात समोर येतो. मधु भावाचा विषय निघाल्यावर अर्जुन सायलीसमोर एक मोठं गुपित ठेवतो. तो सांगतो की मधु भाऊ कोमात जाण्यापूर्वी त्याला एक धक्कादायक गोष्ट सांगून गेले. ते म्हणजे, सायलीचे खरे आई-वडील जिवंत आहेत. हे ऐकताच सायली हादरून जाते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. इतक्या वर्षांपासून हरवलेल्या सत्याचा उलगडा झाल्याने ती भावूक होते.

अर्जुन पुढे सांगतो की ह्याच कारणामुळे तो इतके दिवस तिच्या आई-वडिलांचा शोध घेत होता. मधु भावाची शेवटची इच्छा होती की त्यांचा शोध लागावा. डॉक्टरांच्या मते, जरी मधु भाऊ कोमात असले तरी त्यांना आसपास काय चाललंय याची जाणीव आहे. जर सायलीचे आई-वडील सापडले आणि ते मधु भावासमोर आणले, तर कदाचित त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकेल. हे ऐकल्यानंतर सायलीला अपार आनंद होतो आणि ती अर्जुनच्या या प्रयत्नाला साथ देण्याचं आश्वासन देते.

तर दुसरीकडे प्रियाच्या संशयास्पद हालचाली आणि महिपत-नागराजचा कट या सगळ्यामुळे आगामी भागात आणखी गडद वळण पाहायला मिळणार हे निश्चित आहे. या सर्व घडामोडींमुळे मालिकेतील पुढचा भाग प्रेक्षकांसाठी अधिकच उत्कंठावर्धक ठरणार आहे.