amruta khanvilkar fitness upay pcod upvas dinacharya 40 varshi fit : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असलेली Amruta Khanvilkar आज फिटनेससाठीही तरुणाईची प्रेरणा ठरत आहे. वयाच्या ४० व्या वर्षी तिचा उत्साह, सौंदर्य आणि तंदुरुस्ती पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं. नुकतंच तिनं तिच्या युट्यूब चॅनेलवर चाहत्यांसाठी एक खास व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत तिनं PCOD (Polycystic Ovary Syndrome) वर मात करण्याचा प्रवास आणि त्यासाठी केलेल्या जीवनशैलीतील बदलांबद्दल स्पष्टपणे सांगितलं.
अमृताला जवळपास दशकभरापूर्वी PCOD चा त्रास जाणवू लागला. मात्र औषधांपेक्षा तिनं आपल्या दिनचर्येत बदल करत त्यावर नियंत्रण मिळवलं. यासाठी तिनं intermittent fasting ची सवय अंगीकारली. अमृता सांगते की, तिच्या आहारतज्ज्ञांनी संध्याकाळी सात वाजेपर्यंत जेवण करण्याचा आणि नंतर सकाळी सातनंतरच काही खाण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला १२ तासांचं फास्टिंग करताना तिला थोडं कठीण गेलं, पण हळूहळू ती कालावधी १६ तासांपर्यंत वाढवत नेला.
ती सांगते, “आता मी साधारण ६ वाजताच रात्रीचं जेवण करून घेते. त्यानंतर काही वेळा ब्लॅक कॉफी किंवा चिया सीड्ससोबत लिंबू पाणी घेते. मग १६ तास उपवास झाल्यावर सकाळी व्यवस्थित नाश्ता करते.” या दिनचर्येमुळे तिचं वजन नियंत्रणात आलं, पचनसंस्था मजबूत झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती मानसिकदृष्ट्याही शांत झाली.
हे पण वाचा.. एका वेगळ्या भावनेतून व्यक्त झाली “पूजा सावंत”; नवरात्रौत्सवा निमित्त शेअर केली खास पोस्ट
अमृताने उपवासाच्या विविध पद्धतींचा उल्लेख करत सांगितलं की, काही वेळा ती १२ तास, १४ तास, तर काही वेळा पूर्ण २४ तास उपवास करते. तिच्या मते, अशा जीवनशैलीमुळे शरीराला डिटॉक्स होण्यास मदत होते. ती चाहत्यांना साध्या पद्धतीने सुरुवात करण्याचा सल्ला देत म्हणते की, “७-८ वाजेपर्यंत जेवण करून १२ तास उपवास करणं कुणासाठीही सोपं आहे.”
अमृताची ही दिनचर्या कुठल्याही महागड्या डाएट प्लॅनवर अवलंबून नाही. नैसर्गिक आणि साध्या पद्धतीने जगत तिनं PCOD वर नियंत्रण मिळवलं आणि आज ती फिटनेसचं जिवंत उदाहरण ठरते. Amruta Khanvilkar चा हा अनुभव केवळ चाहत्यांसाठीच नाही, तर आरोग्याची काळजी घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
हे पण वाचा..नेहा पेंडसेच्या लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल”; दिवसेंदिवस होत चाललीय अधिक ग्लॅमरस”









