samir choughule devendra fadnavis maharashtrachi hasyajatra : मनोरंजनविश्वातल्या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये अग्रस्थान पटकावलेला शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. दर आठवड्याला प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणाऱ्या या कार्यक्रमाचे चाहते घराघरात आहेत. केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर परदेशात राहणारे मराठी प्रेक्षकही या शोची आतुरतेने वाट पाहतात. दर्जेदार विनोदी सादरीकरण, कल्पक स्किट्स आणि कलाकारांचा खास टायमिंग सेन्स यामुळे शोने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या कार्यक्रमाचे चाहते फक्त सामान्य प्रेक्षकच नाहीत, तर दिग्गज व्यक्तिमत्त्वेसुद्धा आहेत. अमिताभ बच्चन, लता मंगेशकर यांसारख्या दिग्गजांनीही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’बद्दल आपली पसंती व्यक्त केली होती. आता या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नावदेखील समाविष्ट झालं आहे.
अलीकडेच सोनी मराठीवरील ‘MHJ Unplugged’ या विशेष भागात विनोदी कलाकार Samir Choughule यांनी एक खास किस्सा उलगडला. विमानप्रवासादरम्यान त्यांची भेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी झाली होती. त्यावेळी फडणवीस साहेबांनी स्वतःच्या मोबाईलवर त्यांना टाइमलाईन दाखवत सांगितलं की, “पाहा चौघुलेजी, आमच्या फोनवर सगळीकडे फक्त ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे एपिसोड दिसतात. आम्ही हा शो आवर्जून पाहतो.”
या आठवणींना उजाळा देताना समीर चौघुले म्हणाले की, मुख्यमंत्री स्वतः शोबद्दल इतका उत्साह दाखवत आहेत हे त्यांच्यासाठी मोठं अभिमानाचं होतं. विनोद ही कला फक्त मनोरंजनापुरती न राहता समाजातील प्रत्येक स्तरावर पोहोचते, याचं हे उत्तम उदाहरण असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हे पण वाचा.. तुळजासोबतच्या प्रवासाने बदललं आयुष्य – मृण्मयी गोंधळेकर च्या पोस्टमागे नेमकं काय?”
समीर चौघुले सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गुलकंद’ या चित्रपटातही ते महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले. या चित्रपटात त्यांच्या सोबत सई ताम्हणकर, प्रसाद ओक आणि ईशा डे यांनीही काम केलं होतं. चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने आजवर असंख्य प्रेक्षकांना आनंद दिला आहे. आणि आता या शोचे चाहते मुख्यमंत्री फडणवीस आहेत हे समजल्यावर कलाकारांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांना आनंद झाला आहे.
हे पण वाचा.. “हळद रुसली कुंकू हसलं” मधील दुष्यंतची रिअल लाईफ पत्नी चर्चेत; फोटो पाहून चाहते थक्क







