ADVERTISEMENT

“हळद रुसली कुंकू हसलं” मधील दुष्यंतची रिअल लाईफ पत्नी चर्चेत; फोटो पाहून चाहते थक्क

halad rusali kunku hasla dushyant real life wife : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका "हळद रुसली कुंकू हसलं" मध्ये दुष्यंतची भूमिका करणारा अभिनेते अभिषेक रहाळकर सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. मालिकेत तो कृष्णासोबतच्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत आहे, पण खऱ्या आयुष्यात तो विवाहित असून त्याची पत्नी कृतिका कुलकर्णी सौंदर्य आणि साधेपणामुळे चर्चेत आली आहे.
halad rusali kunku hasla dushyant real life wife

halad rusali kunku hasla dushyant real life wife :  स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका “हळद रुसली कुंकू हसलं” सध्या प्रत्येक घराघरात पोहोचली आहे. दुष्यंत आणि कृष्णाची लगीनघाई प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. या मालिकेत अभिनेते अभिषेक रहाळकर दुष्यंतची भूमिका साकारत असून, त्याच्या अभिनयाला आणि समृद्धी केळकरसोबतच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.

पण मालिकेच्या बाहेरही अभिषेक रहाळकर सध्या चर्चेत आहे आणि त्याचं कारण म्हणजे त्याची रिअल लाईफ पत्नी. होय! काही महिन्यांपूर्वी, जानेवारी महिन्यात अभिषेक लग्नबंधनात अडकला असून त्याच्या पत्नीचं नाव कृतिका कुलकर्णी आहे. कृतिका ही मनोरंजनविश्वापासून दूर असून, ती साधेपणामुळे आणि मोहक व्यक्तिमत्त्वामुळे चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर आलेल्या तिच्या फोटोंना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. अनेकांनी तर मालिकेतील कृष्णाशी तिची तुलना करत, “दिसायला कृष्णा इतकीच सुंदर” अशा कमेंट्स दिल्या आहेत. यामुळे अभिषेकची रिअल लाईफ लव्ह स्टोरीही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

हे पण वाचा.. Kon Hotis Tu Kay Zalis Tu मालिकेतील विद्या उर्फ साक्षी महाजन लग्नबंधनात अडकणार

अभिषेक रहाळकरच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर त्याने स्टार प्रवाहवरील “मन धागा धागा जोडते नवा” या मालिकेतून प्रेक्षकांच्या ओळखीला आला. त्यानंतर त्याने “तू तेव्हा तशी” सारख्या मालिकांमध्येही काम करत आपली छाप पाडली. सध्या मात्र “हळद रुसली कुंकू हसलं” या मालिकेमुळे त्याची लोकप्रियता शिखरावर पोहोचली आहे.

प्रेक्षक मालिकेतल्या दुष्यंत आणि कृष्णाच्या ऑन-स्क्रीन नात्याला जितकं पसंत करत आहेत, तितकीच उत्सुकता अभिषेकच्या रिअल लाईफविषयीही दाखवत आहेत. कृतिका कुलकर्णी आणि अभिषेक रहाळकर यांचे फोटो आता चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून, ही जोडी छोट्या पडद्याबाहेरही लोकांना भावते आहे.

हे पण वाचा.. प्रिया मराठेच्या आठवणीत भावुक झाला अभिजीत खांडकेकर म्हणाला आजारपणातही ती करत होती काम