ADVERTISEMENT

पारू साठी आदित्य सोडणार किर्लोस्करांचं घर, प्रोमो पाहून प्रेक्षकांना धक्का!” Paaru Serial New Twist

Paaru Serial मध्ये आदित्य अखेर सर्वांसमोर पारूवरील प्रेम कबूल करतो. आता नवीन प्रोमोमध्ये दोघे किर्लोस्करांचं घर सोडून स्वतःचा संसार सुरू करणार असल्याचं दाखवलं आहे. पुढे नेमकं काय घडतंय हे पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
Paaru Serial

Paaru Serial Upcoming Twist : छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची मने जिंकणारी ‘पारू’ मालिका सध्या एका मोठ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. शरयू सोनावणे (पारू) आणि प्रसाद जवादे (आदित्य) यांच्या दमदार अभिनयामुळे ही कथा सतत चर्चेत राहते. नुकताच प्रदर्शित झालेल्या नवीन प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.

काही दिवसांपूर्वी मालिकेत आदित्य व साजिरीचा साखरपुडा ठरण्याचा प्रसंग उलगडला. स्वतःच्या मनाविरुद्ध जाऊन आदित्य साजिरीला होकार देतो, मात्र सयामामांच्या हस्तक्षेपामुळे तो साखरपुडा थांबतो. त्यावेळी आदित्य अखेर घरच्यांसमोर सत्य कबूल करत पारूचं नाव घेतो. “मी आधीच पार्वतीशी लग्न केलेलं आहे, आणि ती आता पार्वती आदित्य किर्लोस्कर आहे,” असं सांगत त्याने सर्वांसमोर पारूवरील प्रेम उघड केलं.

सावळ्याची जणू सावली मालिकेत मानसी कुलकर्णीची एन्ट्री; सारंग–सावलीच्या नात्यात नवं वादळ Savlyachi Janu Savali

यानंतर मालिकेच्या कथानकात मोठा धक्का बसतो. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये आदित्य आणि पारू किर्लोस्कर बंगल्याबाहेर उभे असल्याचं दाखवलं आहे. आदित्य पारूचा हात धरून म्हणतो, “चल पारू, आजपासून आपण आपला संसार सुरू करूया.” त्यावर पारू ठामपणे प्रत्युत्तर देते, “आदित्यसर, देवी आईला अभिमान वाटेल असं आयुष्य आपण घडवूया.” या संवादानंतर दोघेही घराबाहेर पडतात.

आता प्रश्न असा की, आदित्य आणि पारू स्वतःहून घर सोडून निघाले की त्यांना अहिल्यादेवींनी बाहेर जाण्यास भाग पाडलं? नेमकं सत्य काय आहे, हे येत्या भागात उलगडणार आहे. पण, किर्लोस्करांच्या आलिशान बंगल्यातून बाहेर पडल्यावर पारू-आदित्यचा संसार कसा आकार घेणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

Paaru Serial’ नेहमीच नवनवीन ट्विस्टमुळे चर्चेत असते आणि या वेळीही कथानकातली नवी कलाटणी प्रेक्षकांना खिळवून ठेवणार यात शंका नाही.