ADVERTISEMENT

हळद रुसली कुंकू हसलं मालिकेतील कृष्णा दुष्यंत गेले महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनाला Halad Rusli Kunku Hasla

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Halad Rusli Kunku Hasla सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली असून, मालिकेतील प्रमुख कलाकार समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर यांनी अलीकडेच कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराला भेट देत खास क्षण अनुभवले. या भेटीदरम्यान त्यांनी चाहत्यांशी संवाद साधला आणि खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
Halad Rusli Kunku Hasla Mahalaxmi Darshan

Halad Rusli Kunku Hasla  : स्टार प्रवाह वरील हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे लवकरच मालिकेमध्ये कृष्णा आणि दुष्यंत यांचा विवाह सोहळा पाहायला मिळणार आहे, अशातच नुकतंच कृष्णा आणि दुष्यंत म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिनेता अभिषेक रहाळकर मालिकेच्या संपूर्ण टीम सोबत कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनाला गेले होते.

अभिनेत्री समृद्धी केळकरने या वेळचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, या फोटोमध्ये आपल्याला मंदिरातील गाभारा त्याचबरोबर मंदिराच्या परिसरातील खास फोटो पाहायला मिळत आहेत, कोल्हापूर दौऱ्यात केवळ दर्शनच नव्हे, तर या कलाकारांनी एका खास सांस्कृतिक कार्यक्रमालाही हजेरी लावली. येथे त्यांनी उपस्थित चाहत्यांशी मनमोकळा संवाद साधला. विशेष म्हणजे, समृद्धी केळकरने महिला चाहत्यांसोबत फुगडी खेळत या क्षणाला अधिक रंगत आणली. हा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून चाहत्यांच्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडतो आहे. Halad Rusli Kunku Hasla  today episode

एकंदरीतच समृद्धी आणि अभिषेक यांनी मालिकेच्या शूटिंग मधून वेळ काढत कोल्हापूरमध्ये सुंदर वेळ घालवला आहे. त्यांच्या फोटोवर चहात्यांनी कमेंट चा पाऊस पडला आहे.

सावळ्याची जणू सावली मालिकेत मानसी कुलकर्णीची एन्ट्री; सारंग–सावलीच्या नात्यात नवं वादळ Savlyachi Janu Savali