ADVERTISEMENT

‘लपंडाव मालिकेचा पहिला भाग : रुपाली भोसलेची दमदार एंट्री, पहिल्याच भागाने प्रेक्षकांची मने जिंकली

lapandav Malika pahila bhag ani pratikriya : स्टार प्रवाहवरील नवीन मालिका 'लपंडाव मालिकेचा पहिला भागाने प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. रुपाली भोसलेच्या ‘सरकार’च्या अभिनयाने आणि कृतिका देवच्या निरागस भूमिकेने प्रेक्षकांना पहिल्याच भागात गुंतवून ठेवलं.
lapandav Malika pahila bhag ani pratikriya

lapandav Malika pahila bhag ani pratikriya : मराठी छोट्या पडद्यावर दर काही महिन्यांनी नवनव्या मालिका प्रेक्षकांसमोर येत असतात. काही मालिका संपून जातात, तर काही पहिल्याच भागापासून प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी होतात. अशाच मालिकांच्या यादीत आता स्टार प्रवाहवरील ‘लपंडाव’ ही नवी मालिका दाखल झाली आहे. १५ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या मालिकेचा पहिला भाग म्हणजेच ‘लपंडाव मालिकेचा पहिला भाग नुकताच प्रेक्षकांसमोर आला आणि सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

या मालिकेत अभिनेत्री कृतिका देव सखीच्या भूमिकेत दिसते आहे. निरागस, साधी पण हटके सखी या व्यक्तिरेखेमुळे प्रेक्षकांच्या मनात लगेच घर करून बसली आहे. तर ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने ‘सरकार’ ही ताकदीची व्यक्तिरेखा साकारली असून, तिच्या दमदार अभिनयाने मालिकेच्या पहिल्या भागालाच रंगत आणली. याशिवाय अभिनेता चेतन वडनेरे कान्हाच्या भूमिकेत असून त्याचं पात्र देखील प्रेक्षकांना आवडलं आहे.

पहिल्याच भागात प्रत्येक पात्राची सुंदर ओळख प्रेक्षकांसमोर साकारली गेली. सखीचं आईप्रेम, सरकारांचा बिझनेसकडे असलेला झुकाव आणि कान्हाचा साधेपणा या सगळ्यांचा मिलाफ प्रेक्षकांना भावून गेला. ‘लपंडाव मालिकेचा पहिला भाग पाहिल्यानंतर अनेकांनी ही मालिका पुढेही रोचक वळण घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

हे पण वाचा.. मालिकांमधील एकसारख्या भूमिका नाकारल्या; ‘लपंडाव’ मालिकेबद्दल चेतन वडनेरेची स्पष्ट भूमिका

स्टार प्रवाहच्या अधिकृत प्रोमो पोस्टवर प्रेक्षकांनी आपली प्रतिक्रिया देताना लिहिलं – “पहिला भाग जबरदस्त होता”, “सरकार एकदम खतरनाक आहेत”, “सखी खूप गोड आहे”, तर काहींनी रुपाली भोसलेच्या व्यक्तिरेखेचं विशेष कौतुक करत “तिच्या ऐवजी कुणीच सरकारच्या भूमिकेला न्याय देऊ शकत नाही” असं म्हटलं.

सर्वसाधारणपणे मालिकेच्या पहिल्या भागाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून सोशल मीडियावर चाहत्यांनी मालिकेला हिरवा कंदील दिला आहे. रुपाली भोसलेचा दमदार अभिनय, कृतिका देवचा निरागसपणा आणि कान्हाची व्यक्तिरेखा या सगळ्यामुळे ‘लपंडाव मालिकेचा पहिला भागाने प्रेक्षकांची मने जिंकली असून पुढील भागांविषयी उत्सुकता निर्माण केली आहे.

हे पण वाचा..‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेचा अनपेक्षित शेवट; दीड वर्षांतच बंद, चाहत्यांमध्ये नाराजी

lapandav Malika pahila bhag ani pratikriya