ADVERTISEMENT

प्रिया मराठेच्या आठवणीत सुबोध भावे भावूक, मोठा भाऊ म्हणून अभिमान वाटतो Subodh Bhave Priya Marathe

Subodh Bhave Priya Marathe अभिनेता सुबोध भावे यांनी अभिनेत्री प्रिया मराठे बद्दलच्या आठवणी सांगत तिच्या स्वभावाचं, जिद्दीचं आणि कामाबद्दलच्या निष्ठेचं भरभरून कौतुक केलं. "मोठा भाऊ म्हणून तिचा अभिमान आहे," अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.
Subodh Bhave Priya Marathe

Subodh Bhave Priya Marathe मराठी इंडस्ट्रीतील गुणी व लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या आकस्मिक निधनानंतर संपूर्ण कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. प्रियाचे अनेक सहकारी तिच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देत आहेत. त्यातच तिचा चुलत भाऊ आणि मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेला अभिनेता सुबोध भावे यानेही प्रियाबरोबरच्या नात्याच्या आणि कामाच्या आठवणी भावनिक शब्दांत मांडल्या.

सुबोध भावे यांनी नुकतीच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, प्रियाचं जाणं ही फार मोठी पोकळी आहे. तिच्या आईसाठी, पती शंतनूसाठी आणि मोठ्या भावासाठी विवेकसाठी हा धक्का किती मोठा असेल याची कल्पनाही करवत नाही. प्रिया लहान असतानाच तिचे वडील, सुहासकाका, वारले होते. त्यांचा खेळकर व आनंदी स्वभाव प्रियामध्येही उतरला होता. “ती अगदी त्यांच्यासारखीच होती—हसरी, माणसांमध्ये रमणारी आणि सकारात्मक उर्जा पसरवणारी,” असं सुबोधने सांगितलं.

सुबोध म्हणतो, “ती माझ्यापेक्षा तब्बल १२ वर्षांनी लहान होती. पण आमचं नातं खूप जवळचं होतं. बालपणापासूनच तिचा स्वभाव माणसांना आपलंसं करणारा होता. कोणतंही नातं असो, तिने त्यात नेहमी प्रामाणिकपणा आणि प्रेम दिलं.”

कामाच्या आठवणींबद्दल बोलताना सुबोधने सांगितलं की, त्यांचं पहिलं काम “कळत नकळत” या मालिकेत झालं होतं. त्यात त्याने प्रियाशी कठोर वागणाऱ्या पात्राची भूमिका केली होती. त्या वेळी प्रिया म्हणाली होती, “दादा, आपण काम करतोय ते पात्रांसाठी. आपल्या नात्यापेक्षा प्राधान्य अभिनयाला द्यायला हवं.” ही तिची समजूतदार वृत्ती त्याला आजही आठवते. त्यानंतर ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’, ‘ती आणि इतर’, तसेच ‘तू भेटशी नव्यानं’ या प्रकल्पांत दोघांनी एकत्र काम केलं.

विशेष म्हणजे, प्रियाने कर्करोगाशी झुंज देत पुन्हा रंगभूमीवर आणि पडद्यावर पुनरागमन केलं होतं. तिच्या जिद्दीचं कौतुक करत सुबोध म्हणतो, “ती खूप गुणी होती, पण इंडस्ट्रीने तिची खरी दखल घेतली नाही. तिच्यात अभिनयाबरोबर सौंदर्य, मेहनत आणि चिकाटी होती.”

प्रियाच्या शेवटच्या काळाबद्दल बोलताना तो म्हणाला, “ती आजारपणात कुणालाही भेटली नाही. कदाचित तिला नको होतं की जवळच्या लोकांनी तिला अशा अवस्थेत पाहावं. ती रडगाणं गाणारी नव्हती. आम्ही सगळे वाट बघत होतो की, एक दिवस ती फोन करून सांगेन – ‘दादा मी पुन्हा काम सुरू केलं आहे.’ पण दुर्दैवानं तसं घडलं नाही.”

कराडच्या ग्रामस्थांची थेट मुंबईत हजेरी; ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेतील स्वरालीच्या अभिनयाचं कौतुक

सुबोध भावेच्या या शब्दांमधून त्याचा बहिणीबद्दलचा अभिमान, प्रेम आणि वेदना स्पष्टपणे दिसून येते. प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहिलेली अभिनेत्री प्रिया मराठे आज शारीरिकरित्या आपल्यात नसली, तरी तिचं कार्य, हसरा चेहरा आणि आठवणी कायम जिवंत राहतील.