ADVERTISEMENT

बिग बॉस 19 : 19 वर्षांनी अर्शद वारसीचं पुनरागमन, सलमान खानऐवजी करणार सूत्रसंचालन

bigg boss 19 jolly llb3 promotion : बिग बॉस १९ मध्ये या आठवड्यात मोठा बदल दिसणार आहे. सलमान खानऐवजी पहिला सीझन होस्ट करणारा अर्शद वारसी तब्बल १९ वर्षांनी सूत्रसंचालक म्हणून परतला आहे.
boss 19 jolly llb3 promotion

bigg boss 19 jolly llb3 promotion : टीव्हीवरील सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो Bigg Boss 19 या आठवड्यात प्रेक्षकांसाठी एक मोठा टर्निंग पॉईंट घेऊन येत आहे. सलमान खानने सलग अनेक वर्षं ‘वीकेंड का वार’ होस्ट करत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. मात्र यंदा पहिल्यांदाच सलमान या भागात दिसणार नाही. कारण तो सध्या आपल्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

सलमानच्या जागी प्रेक्षकांना एक परिचित पण जुनं चेहरं पाहायला मिळणार आहे. तब्बल १९ वर्षांनी अभिनेता अर्शद वारसी पुन्हा एकदा बिग बॉसच्या रंगमंचावर सूत्रसंचालक म्हणून परतत आहे. विशेष म्हणजे, बिग बॉसचा पहिला सीझन म्हणजेच 2006 मधील Bigg Boss 1 याच अर्शद वारसीने होस्ट केला होता. त्यामुळे चाहत्यांसाठी ही पुनरागमनाची बातमी अधिकच खास ठरली आहे.

या आठवड्यातील ‘वीकेंड का वार’च्या एपिसोडमध्ये अर्शद वारसीसोबत अभिनेता अक्षय कुमार आणि ज्येष्ठ कलाकार सौरभ शुक्ला देखील दिसणार आहेत. हे दोघे त्यांच्या आगामी ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये येणार आहेत. त्यामुळे या भागात मनोरंजनाची डबल डोस मिळणार आहे.

अर्शद वारसीने होस्टिंगबाबत आपला अनुभव शेअर करताना सांगितलं की, “बिग बॉसमध्ये होस्टिंगची खरी गंमत म्हणजे आपल्याला फार काही करावं लागत नाही. घरातील सदस्य स्वतःच भांडतात, हसतात, रडतात आणि एकमेकांशी भांडत-मैत्री करत राहतात. एका क्षणी ते जिवलग असतात तर दुसऱ्याच क्षणी कट्टर विरोधक. हे पाहणं मजेशीर असतं.”

हे पण वाचा.. ‘सुपर डान्सर’मध्ये Shilpa Shetty चं भावूक क्षण; इंडस्ट्रीतील ३० वर्षांचा प्रवास खास सरप्राईजसह साजरा

तो पुढे म्हणाला की, या वेळेस त्याच्यासोबत अक्षय कुमार देखील मंचावर असणार असल्याने मजा आणखी वाढणार आहे. “अक्षय खूप स्पष्ट बोलतो आणि मी थट्टामस्करी करतो, त्यामुळे यंदा घरातील सदस्यांसाठी डबल ट्रबल असणार आहे,” असेही अर्शदने हसत म्हटलं.

सलमान खान नसल्याने प्रेक्षकांना नक्कीच धक्का बसणार आहे, पण अर्शद वारसीच्या पुनरागमनामुळे Bigg Boss 19 चा हा आठवडा प्रेक्षकांसाठी संस्मरणीय ठरणार यात शंका नाही.

हे पण वाचा..पंजाबच्या पुरपरिस्थितीत सलमान खानचा मदतीचा हात ‘बिग बॉस 19 ’च्या मंचावर व्यक्त केली भावना..