ADVERTISEMENT

आजीने काढलेली दृष्ट.. भावूक झाला शिव ठाकरे; वाढदिवसाच्या खास क्षणांनी चहात्यांची जिंकली मनं

shiv thakare vadhdivas aji drishti : शिव ठाकरे च्या वाढदिवसाला आजीने काढलेली दृष्ट चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरली. साधेपणाचं हे अनोखं नातं पाहून अभिनेता स्वतः भावूक झाला.
shiv thakare vadhdivas aji drishti

shiv thakare vadhdivas aji drishti : मनोरंजन विश्वात आपल्या मेहनतीने आणि साधेपणाने वेगळी ओळख निर्माण करणारा Shiv Thakare नुकताच वाढदिवस साजरा करताना दिसला. सोशल मीडियावर चाहत्यांनी आणि मित्रमंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला असताना, घरच्या मंडळींनी केलेलं औक्षण आणि आजीने काढलेली दृष्ट हे क्षण त्याच्यासाठी अधिक खास ठरले.

शिवच्या वाढदिवसानिमित्त आई, बहीण आणि कुटुंबीयांनी त्याचं औक्षण केलं, याचे फोटो व व्हिडीओ त्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले. मात्र त्यातली सर्वात भावनिक गोष्ट म्हणजे आजीने काढलेली दृष्ट. महागड्या गिफ्ट्सऐवजी आजीच्या मायेची ही भेट शिवला अधिक अनमोल वाटली. व्हिडीओमध्ये आजीचा साधेपणा आणि नातवाबद्दलचा जिव्हाळा स्पष्टपणे दिसत होता.

शिव ठाकरे सोशल मीडियावर खूप सक्रीय असून, तो नेहमीच आपल्या आजीबरोबरचे क्षण चाहत्यांशी शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने आजीसह परदेश दौरा केला होता. महागड्या गाड्यांमध्ये आणि विमानातून आजीला फिरवताना त्यांचे खास व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. त्यामुळे शिव आणि त्याच्या आजीची जोडी चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.

हे पण वाचा.. “Hruta Durgule : टेलिव्हिजनवर पुनरागमनाबद्दल हृता दुर्गुळेचं मोठं वक्तव्य; म्हणाली- ‘तेवढी कमिटमेंट आता शक्य नाही’”

‘रोडीज’पासून ते ‘बिग बॉस मराठी’ आणि ‘बिग बॉस हिंदी’ पर्यंतच्या प्रवासात शिव ठाकरे ने स्वतःला एक मेहनती आणि जमिनीवर राहणारा कलाकार म्हणून सिद्ध केलं. त्याचा निरागस स्वभाव, मनमोकळं हास्य आणि घरच्यांबद्दलचं प्रेम यामुळे तो चाहत्यांच्या मनात कायमचं घर करून बसला आहे.

या वाढदिवशी सोशल मीडियावर लाखो शुभेच्छा मिळाल्या तरी आजीच्या हातून मिळालेलं औक्षण आणि दृष्ट त्याच्यासाठी सर्वात खास ठरलं. साधेपणाचं आणि मायेचं हे नातं पाहून अनेक चाहत्यांनीही प्रतिक्रिया देत म्हटलं की, “यालाच म्हणतात खरी श्रीमंती.”

हे पण वाचा.. “Abhijeet Chavan fake death news” : खोट्या मृत्यूच्या बातमीवर अभिजीत चव्हाणचा संताप