ADVERTISEMENT

घरच्यांचा विरोध असेल तर लग्नच नाही; प्रिया बापट उमेश कामत यांची प्रेमकहाणी Priya Bapat Umesh Kamat marriage

Priya Bapat Umesh Kamat marriage मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल खास खुलासा केला आहे. लग्नाआधी त्यांनी घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय आता चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
Priya Bapat Umesh Kamat marriage

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेक वर्षे अभिनयाच्या क्षेत्रात आपल्या कामगिरीने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या जोडीने नुकतंच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी काही खास आठवणी शेअर केल्या आहेत. ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या Priya Bapat & Umesh Kamat Lovestory विषयी उघडपणे सांगितले.

प्रिया आणि उमेश यांची जोडी नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय राहिली आहे. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले, परंतु तातडीने लग्नाचा निर्णय त्यांनी घेतला नाही. या मुलाखतीत प्रिया बापट म्हणाली, “आम्ही प्रेमात पडलो आणि लगेच लग्न केलं असं काही नव्हतं. जवळपास सात-आठ वर्ष आम्ही एकत्र होतो, पण कधीही लिव्ह-इनमध्ये राहण्याचा विचार मनात आला नाही. आम्ही एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ घेतला.” Priya Bapat Umesh Kamat marriage

त्यावर उमेश कामतही पुढे म्हणाला की, “आम्ही पटकन लग्नाचा निर्णय घेतला नाही. घरच्यांना सांगण्यासाठीसुद्धा आम्ही योग्य वेळ बघितला. खरंच आम्हाला एकमेकांविषयी प्रामाणिक भावना आहेत का, याची खात्री करूनच आम्ही पुढे गेलो. त्या काळात लिव्ह-इनमध्ये राहून पाहू, मग लग्न करू, हा विचार कधीच मनात आला नाही.”

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, उमेशने सांगितलेला त्यांचा ठाम निर्णय. “जर घरच्यांनी परवानगी दिली नसती तर आम्ही पळून जाऊन लग्न केलं नसतं. उलट आम्ही ठरवलं होतं की, जर घरच्यांना मान्य नसेल तर एकतर आम्ही लग्न करणार नाही किंवा दुसऱ्या कोणाशी विवाह करणार नाही. आईवडिलांना दुखावण्याचा प्रश्नच नव्हता.”

या विधानातून प्रिया बापट आणि उमेश कामत या जोडप्याचा परस्परांबद्दलचा आदर आणि घरच्यांविषयी असलेली संवेदनशीलता स्पष्टपणे दिसून येते. प्रेमसंबंधांमध्ये जबाबदारीने घेतलेले निर्णय कसे असतात याचं हे उत्तम उदाहरण आहे.

हे पण वाचा : हळद रुसली कुंकू हसलं मालिकेतील बाळजाबाईच्या मुली एक मॉडेल तर दुसरी गुगलमध्ये कामाला Halad Rusli Kunku Hasla

आज दोघंही आपापल्या करिअरमध्ये व्यस्त असले तरी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे ते लवकरच एका नव्या चित्रपटातून एकत्र झळकणार आहेत. त्यांचा हा चित्रपट आणि त्यांच्या Priya Bapat & Umesh Kamat Lovestory विषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली आहे.