ADVERTISEMENT

“आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका; पारू फेम मुग्धा कर्णिकचा सल्ला”

mugdha karniks advice on health and diet : ‘पारू’ फेम अभिनेत्री मुग्धा कर्णिक (Mugdha Karnik's) हिने आरोग्याविषयी मोलाचा सल्ला दिला आहे. घरचं जेवण आणि स्वतःसाठी वेळ काढणं हेच निरोगी राहण्याचं खरं गुपित असल्याचं ती म्हणाली.
mugdha karniks advice on health and diet

mugdha karniks advice on health and diet : सध्याच्या व्यस्त दिनचर्येमुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक जण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. चुकीच्या आहारामुळे, अपुरी झोप आणि सततच्या तणावामुळे त्वचा, केस आणि एकूण शरीरावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत ‘पारू’ फेम अभिनेत्री मुग्धा कर्णिक (Mugdha Karnik’s) हिने आरोग्याबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

अलीकडे दिलेल्या मुलाखतीत मुग्धा कर्णिक म्हणाली, “आपल्या शरीराची, चेहऱ्याची आणि एकूणच आरोग्याची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण शेवटी आपल्या आरोग्याची जबाबदारी फक्त आपलीच असते. आपण स्वतः काळजी घेतली नाही, तर त्याचा त्रास आपल्यालाच सहन करावा लागतो.”

तिने पुढे सांगितले की, सातत्याने शरीराची काळजी घेतली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. लोक सतत आजारी पडतात किंवा त्यांना विविध त्रास होतात, यामागे प्रमुख कारण म्हणजे जीवनशैलीतील बेफिकीरी. मुग्धा कर्णिकच्या मते, दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढणे हा स्वार्थ नसून गरज आहे.

आहाराबद्दल बोलताना ती म्हणाली, “घरचं जेवण हे सर्वात उत्तम औषध आहे. कारण त्यातून आपल्याला शरीराला आवश्यक असलेली सगळी पोषणतत्त्वे मिळतात. अधूनमधून बाहेरचं खाल्लं तरी चालतं, पण नियमित घरच्या अन्नाला पर्याय नाही.” तिच्या मते, बाहेरचे फास्ट फूड आणि अस्वस्थ आहारामुळे त्वचा व केसांवर विपरीत परिणाम होतो.

हे पण वाचा.. “तू हिरोईन मटेरियल नाहीस म्हणून मालिकेतून बाहेर काढलं”; ऋतुजा बागवेने शेअर केला कडू अनुभव

सध्या ‘पारू’ या मालिकेत अहिल्यादेवी किर्लोस्कर ही दमदार भूमिका साकारणारी मुग्धा कर्णिक मालिकेत जशी खंबीर आणि ठाम व्यक्तिमत्त्वाची भूमिका करते, तशीच प्रत्यक्ष आयुष्यातही लोकांसाठी प्रेरणादायी ठरते आहे. उद्योगजगतात स्थान मिळवणारी, घरातही कडक पण प्रेमळ स्वभावाने वावरणारी तिची ही भूमिका प्रेक्षकांना भावते.

तिच्या मते, निरोगी शरीर आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच व्यक्ती सर्व संकटांना सामोरे जाऊ शकते. त्यामुळे तिचा हा संदेश केवळ चाहत्यांसाठीच नव्हे तर प्रत्येकासाठी महत्त्वाचा ठरतो.

हे पण वाचा.. डफली वाजवताना अशोक सराफ यांचा व्हिडीओ व्हायरल चाहते म्हणाले.. अशोक मामा..