rutuja bagwe opens up about marriage : मराठी मालिकांपासून ते चित्रपट आणि रंगभूमीपर्यंत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री ऋतुजा बागवे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या वेळी कारण तिच्या आगामी प्रोजेक्ट्सपेक्षा वैयक्तिक आयुष्याशी निगडीत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऋतुजाने लग्न आणि नात्यांबद्दल आपले विचार स्पष्टपणे मांडले.
ऋतुजा बागवे म्हणाली की, प्रत्येक नातं टिकवण्यासाठी उन्नीस-बीस करावंच लागतं. एखादं नातं टिकवण्यासाठी कधी इगो बाजूला ठेवावा लागतो, तर कधी थोडा सेल्फ-रिस्पेक्ट शिथिल करावा लागतो. पण हे करतानाही योग्य ठिकाणी योग्य भूमिका घेणं महत्त्वाचं असतं. तिच्या मते, आजच्या काळात अनेकांना जबाबदाऱ्या घ्यायच्या नसतात, काहींना स्वातंत्र्याचं आयुष्य जगायचं असतं, तर काही पूर्णपणे करिअरकडे लक्ष केंद्रित करतात. या सगळ्या कारणांमुळे अनेकदा योग्य जोडीदार सापडत नाही.
तिच्या म्हणण्यानुसार, “कधी कधी दोन स्वतंत्र आणि चांगली माणसं असली तरी त्यांचं कपल म्हणून जुळून येईलच असं नाही. काही लोकांना नात्याची गरजच नसते. ते त्यांच्या आयुष्याचा आनंद त्यांच्या पद्धतीने घेत असतात.”
लग्नाविषयी विचारले असता ऋतुजा बागवेने candid उत्तर दिलं – “माझ्यासाठी अजून ते गणित जुळलेलं नाही. मला आवडणाऱ्यांमध्ये मला आवडतं व्यक्ती मिळालेली नाही. आणि ज्यांना मी आवडते ते मला आवडत नाहीत. त्यामुळे जेव्हा हे गणित जुळेल, तेव्हा सगळं ठरेल.”
तिच्या या उत्तरातून हे स्पष्ट होतं की ऋतुजा बागवे लग्नाकडे केवळ सामाजिक जबाबदारी म्हणून पाहत नाही, तर तिला तिचा जोडीदार खरोखरच योग्य वाटावा अशी तिची अपेक्षा आहे. ती म्हणाली की, नातं टिकवताना अनेक वेळा एडजस्टमेंट किंवा सॅक्रिफाइस करावं लागतं, पण त्याचा अर्थ स्वतःला विसरणं नाही. उलट, योग्य वेळी योग्य भूमिका घेणं आवश्यक आहे.
हे पण वाचा.. डफली वाजवताना अशोक सराफ यांचा व्हिडीओ व्हायरल चाहते म्हणाले.. अशोक मामा..
ऋतुजाने या मुलाखतीत ‘स्वातंत्र्य’ आणि ‘स्वैराचार’ यातील फरकही अधोरेखित केला. तिच्या मते, स्वातंत्र्य म्हणजे आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगणं, पण त्याचा गैरवापर करून ते स्वैराचार ठरू नये.
कलाविश्वातील आपली व्यस्त दिनचर्या आणि कामाच्या व्यापातही ऋतुजा बागवे प्रामाणिकपणे सांगते की, तिच्या आयुष्यातला हा अध्याय अजून सुरू व्हायचा आहे. पण तिच्या चाहत्यांना खात्री आहे की जेव्हा हे “गणित जुळेल”, तेव्हा ऋतुजाच्या आयुष्यातील नवी सुरुवात सर्वांसाठी आनंदाची ठरेल.
हे पण वाचा… “लहानपणी मला…” अभिनेत्री तितीक्षा तावडेची बहिण अभिनेत्री खुशबू तावडेसाठी भावनिक पोस्ट









