ADVERTISEMENT

भूमिका साकारताना मजा येत नाही; पण…” ‘लक्ष्मी निवास’ फेम Tanvi Kolte ची मनमोकळी कबुली

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सिंचना ही भूमिका करणारी अभिनेत्री Tanvi Kolte हिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या भूमिकेबद्दल प्रामाणिक कबुली दिली. "भूमिका साकारताना मजा येत नाही, पण प्रेक्षक स्वीकारतील या विश्वासानेच मी काम करत आहे," असं ती म्हणाली.
Tanvi Kolte

सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक ठरलेली ‘लक्ष्मी निवास’ प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. कौटुंबिक नात्यांतील गुंतागुंती, भावनिक प्रसंग आणि दमदार व्यक्तिरेखांमुळे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली आहे. यात अनेक दमदार कलाकार भूमिका साकारत आहेत. त्यापैकी अभिनेत्री तन्वी कोलते (Tanvi Kolte) ‘सिंचना’ ही भूमिका करत असून नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या भूमिकेबद्दल आणि अनुभवाबद्दल मन मोकळं केलं आहे.

Tanvi Kolte ने कबूल केलं की, ‘सिंचना’ या व्यक्तिरेखेमुळे तिला भावनिक संघर्ष करावा लागतो. ती म्हणाली, “सिंचनाचा रुद्रावतार दाखवताना मला खूप अवघड जातं. जेव्हा मला स्क्रिप्ट मिळाली आणि समजलं की मला ‘लक्ष्मी’ची लायकी काढायची आहे, तेव्हा अक्षरशः मी रडले. सरांकडे जाऊन विचारलं की, मी हे संवाद कसे बोलू? कारण लक्ष्मी या व्यक्तिरेखेनं नेहमी माझा आधार दिला आहे. मग त्यांनी मला सांगितलं की, लक्षात ठेव – हे सिंचना बोलतेय, तन्वी नाही.”

Tanvi Kolte च्या मते, अभिनय करताना ती व्यक्तिरेखेत पूर्णपणे शिरते, त्यामुळे नकारात्मक संवाद देताना तिला मानसिकदृष्ट्या कठीण जातं. “मी सरांना सांगितलं होतं की, मला अजिबात मजा येत नाहीये हे करताना. पण सिंचना माझ्यापेक्षा वेगळी आहे. प्रेक्षक मला स्वीकारतील या भावनेनं मी अजूनही ही भूमिका निभावत आहे,” असं ती म्हणाली.

Tanvi Kolte पुढे सांगते, “सिंचनाचं वागणं खूप आक्रमक आहे. कधी ती घर सोडून जाते, कधी कुटुंबावर रागावते. असाच एक सीन होता, जिथे लक्ष्मी आणि श्रीनिवास तिला थांबवत रडतात. तो सीन संपल्यावर मी हर्षदा खानविलकर आणि तुषारला ‘सॉरी’ म्हणाले. पण त्यांनीच मला समजावलं की एवढं मनावर घेऊ नकोस. नंतर संपूर्ण युनिटनं माझं कौतुक केलं.”

हे पण वाचा.. Atharva Sudame नंतर Danny Pandit च्या रीलची चर्चा; गणेशोत्सवातून दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

या भूमिकेमुळे प्रेक्षकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया येतील याचीही भीतीTanvi Kolte ला वाटते. ती स्पष्टपणे सांगते की, अशा व्यक्तिरेखा तिला सहजशा आवडत नाहीत, कारण त्या तिच्या स्वभावाशी खूप वेगळ्या आहेत. मात्र, अभिनयाचा हा एक भाग आहे आणि नवीन आव्हानं स्वीकारणं गरजेचं आहे, असंही तन्वी कोलतेनं सांगितलं.

लक्ष्मी निवास’ मालिकेमध्ये Tanvi Kolte च्या अभिनयाचं कौतुक होत असलं तरी, या भूमिकेमुळे तिला आतून भावनिक ताण जाणवतोय, ही तिची प्रामाणिक कबुली चाहत्यांनाही भावून गेली आहे.

हे पण वाचा.. ‘आई कुठे काय करते’ फेम Abhishek Deshmukh ने शाडूच्या मातीची बाप्पाची मूर्ती घडवली, सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर

Tanvi Kolte इंस्टाग्राम पोस्ट..