2025 Honda Shine लाँच: नवा लुक, आधुनिक तंत्रज्ञान डिझाइन,आणि दमदार परफॉर्मन्स”

2025 Honda Shine


Honda Shine चे नवीन 2025 Honda Shine मॉडेल लाँच करण्यात आले आहे आणि तिला नव्या सोयी-सुविधा आणि अपग्रेड डिझाईनमध्ये सादर केले गेले आहे नवीन Honda Shine हे भारतातील 125cc बाईक सेगमेंटमधील एक चांगला ऑप्शन ठरू शकते.

Honda Motorcycle & Scooter India (HMSI) ने आपल्या खूप पसंत केल्या जाणाऱ्या 125cc सेगमेंटमध्ये नवा बदल करत 2025 Honda Shine लाँच केली आहे. ही बाईक नव्या सोयी-सुविधा, अपग्रेड डिझाईन आणि इंधन कार्यक्षमतेच्या संयोगाने बाजारात सादर करण्यात आली आहे. ड्रम व्हेरिएंटची किंमत ₹84,493, तर डिस्क व्हेरिएंटची किंमत ₹89,245 आहे.

नवीन Shine ही 12 फेब्रुवारी 2025 रोजी अधिकृतपणे लाँच करण्यात आली आहे. ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षां लक्षात घेऊन, ही बाईक नवे फीचर्स आणि नव्या तंत्रज्ञानासह उपलब्ध केली आहे.

नवीन आकर्षक डिझाईन

Honda Shine 2025 हे मॉडल पूर्वीच्या मॉडेलप्रमाणेच स्टायलिश आणि प्रॅक्टिकल डिझाईन कायम ठेवले आहे.
परंतु यामध्ये काही नवीन बदल केले गेले आहेत. सर्वात मोठा बदल म्हणजे मागील टायर आता 90mm रुंद जो मागील मॉडेलमध्ये 80mm देण्यात आला होता, ज्यामुळे रोड ग्रिप सुधारते आणि बाईक नियंत्रित होण्यास मदत होते.

नवीन Honda Shine सहा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे:
1. Pearl Igneous Black (नवीन आणि ट्रेंडी पर्याय)
2. Geny Gray Metallic
3. Matte Axis Gray Metallic
4. Rebel Red Metallic
5. Decent Blue Metallic
6. Pearl Siren Blue

हे पण वाचा ..2025 Honda Hornet 2.0: किंमत, वैशिष्ट्ये आणि अपडेट्स

शक्तिशाली इंजिन आणि OBD2B तंत्रज्ञान

2025 Honda Shine मध्ये 123.94cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले असून. हे 10.6 bhp @ 7,500 rpm आणि 11 Nm टॉर्क @ 6,000 rpm निर्माण करते. यासोबत 5-स्पीड गिअरबॉक्स आहे आणि हे गिअरशिफ्टिंग अतिशय स्मूथ आहे.

नवीन Honda Shine भारतात OBD2B पर्यावरण नियमांचे पालन करणारे इंजिन असलेले पहिले मॉडेल आहे, हे इंजिन E20 इंधनावर (20% एथेनॉल मिश्रित पेट्रोल) कार्यक्षमतेने चालते, त्यामुळे हे पर्यावरणपूरक आहे.

इंधन बचतीसाठी Idling Stop System

Honda ने नवीन Shine मध्ये Idling Stop System समाविष्ट केला आहे. ट्रॅफिक सिग्नलवर गाडी थांबल्यावर इंजिन आपोआप बंद होण्याची सुविधा आहे. आणि गॅस दाबल्यावर इंजिन सुरू होते.यामुळे इंधन बचत होते आणि प्रदूषण कमी होते.

नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि तंत्रज्ञान

नवीन Shine मध्ये पूर्णतः डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. यामध्ये:रिअल-टाइम मायलेज,डिस्टन्स-टू-एम्प्टी,गिअर पोजिशन इंडिकेटर,सर्व्हिस ड्यू रिमाइंडर,हे सर्व फीचर्स ऑटो-डिमिंग डिस्प्ले सह उपलब्ध आहेत, ज्यामुळे दिवसा आणि रात्री दोन्हीवेळी स्पष्ट दिसते.

हे पण वाचा..nothing Phone(3a) सीरीजची खास झलक

USB Type-C चार्जिंग पोर्ट

नवीन Honda Shine मध्ये USB Type-C चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे, ज्यामुळे राइड दरम्यान मोबाईल चार्ज करता येणार आहे. खासकरून अर्बन रायडर्स साठी हा एक महत्त्वाचा अपग्रेड आहे.

कम्फर्ट आणि सेफ्टी फिचर्स

2025 Honda Shine मध्ये रायडरच्या कम्फर्टसाठी टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि 5-स्टेप अॅडजस्टेबल ड्युअल रियर शॉक ऍब्जॉर्बर आहेत. यामुळे खराब रस्त्यांवरही रायडिंग आरामदायक होते.

ब्रेकिंग साठी दोन पर्याय उपलब्ध आहेत:

ड्रम ब्रेक व्हेरिएंट: 130mm फ्रंट आणि 130mm रियर ड्रम ब्रेक्स

डिस्क ब्रेक व्हेरिएंट: 240mm फ्रंट डिस्क आणि 130mm रियर ड्रम

दोन्ही व्हेरिएंटमध्ये Combi-Brake System (CBS) with Equalizer देण्यात आले आहे, जे रायडिंग अधिक सुरक्षित बनवते.

स्पर्धा आणि किंमत

नवीन Honda Shine ची सुरुवातीची किंमत ₹84,493 आहे, जी एक्स-शोरूम, किंमत आहे.
125cc सेगमेंटमध्ये Honda Shine ही बाईक Hero Super Splendor, Bajaj Pulsar 125, आणि TVS Radeon यांच्याशी थेट स्पर्धा करणार आहे.

2025 Honda Shine ही फक्त एक बाईक नाही, तर भारतीय रायडर्सच्या बदलत्या गरजांसाठी एक परिपूर्ण पर्याय असून. नवीन Shine आता Honda च्या सर्व अधिकृत डीलरशिपमध्ये उपलब्ध झाली आहे. Honda Shine आपल्या “Naye India Ki Amazing Shine” या घोषणेसोबत नवीन युगात प्रवेश केला आहे!

हे पण वाचा ..Honda Hornet 2.0 vs TVS Apache RTR 200 4V: कोणती बाईक अधिक चांगली?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *