होंडाने आपली 2025 Honda Hornet 2.0 ही स्ट्रीटफायटर स्पोर्ट बाईक अपडेट करून आणली आहे.
Table of Contents
नवीन ग्राफिक्स, अत्याधुनिक फीचर्स आणि नवीन मानकांनुसार सुधारित इंजिनसह ही बाइक राइडर्ससाठी अधिक आकर्षक पर्याय बनवून बाजारात सादर करण्यात आली आहे. तर चला जाणून घ्या या बाईकची संपूर्ण माहिती.
होंडाने आपल्या लोकप्रिय स्ट्रीटफायटर स्पोर्ट बाईक Honda Hornet 2.0 चा 2025 नवीन अंदाज सादर केला आहे. आकर्षक डिझाइन, नवीन रंगसंगती, अत्याधुनिक फीचर्स आणि नवीन सुधारित इंजिनसह ही बाईक राइडर्ससाठी एक उत्कृष्ट निवड ठरली आहे. ₹1,56,953 (एक्स-शोरूम, दिल्ली) किंमतीसह ही बाईक दमदार परफॉर्मन्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम संगम आहे.
तुम्ही जर एक स्टायलिश, दमदार आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेली स्पोर्ट बाईक शोधत असाल, तर Honda Hornet 2.0 नक्कीच तुम्हाला ही बाईक आकर्षित करेल. चला, तर जाणून घेऊया या बाईकचे महत्त्वाचे अपडेट्स आणि वैशिष्ट्ये.
1. डिझाइन आणि रंगसंगती
Honda Hornet 2.0 ही बाईक तिच्या अॅग्रेसिव्ह आणि स्पोर्टी लुकसाठी ओळखली जाते.आणि 2025 च्या मॉडेलमध्ये नवीन ग्राफिक्ससह पुन्हा एकदा आकर्षण निर्माण करणारा लूक देण्यात आला आहे.
ही बाईक चार नवीन रंगांमध्ये उपलब्ध आहे:
Pearl Igneous Black
Radiant Red Metallic
Athletic Blue Metallic
Mat Axis Gray Metallic
हे ताजेतवाने रंग बाईकला जास्त स्पोर्टी आणि आधुनिक लूक देतात, जे नव्या पिढीच्या रायडर्सना नक्कीच आवडतील असे दिले आहेत.
2. इंजिन आणि परफॉर्मन्स
Honda Hornet 2.0 मध्ये 184.40cc क्षमतेचे एकच सिलिंडर, हवेद्वारे थंड करण्यात येणारे इंजिन दिले आहे. हे इंजिन OBD2B excretion नियमांनुसार प्रगत करण्यात आले आहे.
इंजिनची ताकद:
16.7 bhp @ 8,500 rpm
15.7 Nm Torque @ 6,000 rpm
ही बाईक 5-स्पीड गिअरबॉक्ससोबत उपलब्ध होते, ज्यामध्ये Assist & Slipper Clutch आहे. हे क्लच सिस्टम गिअर बदलताना अधिक सोपेपण प्रदान करते आणि रायडरचा थकवा कमी करतं.
नवीन मानकांनुसार ही बाईक जास्त इंधन कार्यक्षम असून, दमदार परफॉर्मन्स देते.
3. सस्पेंशन आणि ब्रेकिंग सिस्टम
राइडिंग कम्फर्ट आणि स्थिरता वाढीसाठी Honda Hornet 2.0 मध्ये चांगल्या दर्जाचे सस्पेंशन आणि ब्रेकिंग सिस्टम दिलं गेलं आहे.
गोल्ड-कलर अपसाइड-डाऊन फ्रंट फॉर्क्स
रियर मोनोशॉक सस्पेंशन
या बाईकमध्ये 17-इंचाच्या अलॉय व्हील्स देण्यात आल्या आहेत यात 110-सेक्शन फ्रंट टायर आणि 140-सेक्शन रियर टायर देण्यात आला असून, रायडर्सना बाईक चालवताना रस्त्यावर चांगली ग्रिप आणि स्थिरता मिळणार आहे.
ब्रेकिंग सिस्टमसाठी:
276mm फ्रंट डिस्क ब्रेक
220mm रिअर डिस्क ब्रेक
हे दोन ब्रेक रायडरला अधिक सुरक्षित आणि आत्मविश्वासाने रायडिंगचा अनुभव देणारं आहेत.
4. अत्याधुनिक फीचर्स आणि टेक्नॉलॉजी
2025 च्या Honda Hornet 2.0 या मॉडेलमध्ये अनेक बरेच आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत, जे रायडिंगला आणखी आरामदायक आणि स्मार्ट बनवतात.
नवीन 4.2-इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
या डिजिटल डिस्प्लेमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट दिला आहे. आणि या गाडीचा प्रत्येक रायडर Honda RoadSync अॅपच्या मदतीने खालील सुविधा वापरू शकतात.
Turn-by-turn नेव्हिगेशन
इनकमिंग कॉल अलर्ट्स
SMS नोटिफिकेशन्स
USB Type-C चार्जिंग पोर्ट
लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान मोबाईल चार्जिंगसाठी USB Type-C चार्जिंग पोर्ट देण्यात आला असून,आजच्या डिजिटल युगातील रायडर्ससाठी फायदेशीर आहे
हे पण वाचा ..Honda Hornet 2.0 vs TVS Apache RTR 200 4V: कोणती बाईक अधिक चांगली?
5. किंमत आणि स्पर्धक बाइक्स
Honda Hornet 2.0 ची प्राइस ₹1,56,953 (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. ही बाईक TVS Apache RTR 200 4V, Bajaj Pulsar NS200 आणि Yamaha MT-15 बाइक्ससोबत स्पर्धे करणार आहे.
2025 ची Honda Hornet 2.0 ही बाईक हाय-टेक रायडर्ससाठी एक दर्जेदार पर्याय आहे. दमदार इंजिन, अत्याधुनिक फीचर्स, आकर्षक डिझाइन आणि उत्कृष्ट ब्रेकिंग-सस्पेंशन सेटअप यामुळे ही बाईक स्ट्रीटफायटर सेगमेंटमध्ये आपले वेगळेपण सिद्ध करते.
जर तुम्ही स्पोर्टी, आधुनिक आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज बाईक शोधत असाल, तर Honda Hornet 2.0 नक्कीच तुमच्या यादीत असायला हवी.
.