Zee Marathi Paaru Serial Update : झी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी सातत्याने नवनवीन आणि वेगळ्या धाटणीच्या मालिका सादर करत असते. येत्या काही दिवसांत वाहिनीवर ‘शुभ श्रावणी’, ‘सनई चौघडे’ आणि ‘दीप ज्योती’ अशा नव्या मालिकांचा शुभारंभ होणार आहे. यामध्ये विशेष लक्ष वेधून घेतलं आहे ते ‘शुभ श्रावणी’ या मालिकेने. नुकताच या मालिकेच्या प्रदर्शनाचा मुहूर्त जाहीर करण्यात आला असून लोकप्रिय अभिनेत्री वल्लरी विराज आणि अभिनेता सुमित विजय प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
‘शुभ श्रावणी’ नेमकी कोणत्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याबाबत उत्सुकता होती. अखेर झी मराठीने हा सस्पेन्स दूर करत जाहीर केलं आहे की ही नवी मालिका १९ जानेवारीपासून दररोज संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे. याच स्लॉटमध्ये सध्या Zee Marathi Paaru Serial दाखवली जात होती. त्यामुळे ‘पारू’ बंद होणार का, असा प्रश्न अनेक प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला होता.
या चर्चांवर पूर्णविराम देत ‘पारू’ मालिकेतील प्रमुख पात्राने स्वतः व्हिडीओ शेअर करून प्रेक्षकांना दिलासा दिला आहे. Paaru मालिका बंद होत नसून, फक्त तिची वेळ बदलली जात आहे. १९ जानेवारीपासून ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ११ वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे. वेळ बदलली असली तरी प्रेक्षकांशी असलेलं नातं तसंच राहील, असा भावनिक संदेश या व्हिडीओतून देण्यात आला आहे.
“वेळ बदलली तरी तुमचं आमच्यावरचं प्रेम कायम आहे. नव्या उमेदीने, तितक्याच जिव्हाळ्याने पारू तुम्हाला भेटायला येणार आहे,” असं सांगत मालिकेच्या टीमने चाहत्यांचे आभार मानले आहेत. या घोषणेनंतर सोशल मीडियावर पारूला नव्या प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा मिळत आहेत.
Zee Marathi Paaru Serial च्या कलाकारांविषयी सांगायचं झालं तर, या मालिकेत शरयू सोनावणे आणि प्रसाद जवादे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय मुग्धा कर्णिक, विजय पटवर्धन, पूर्वा शिंदे यांसारख्या अनुभवी कलाकारांनी कथेला सशक्त बनवलं आहे. भावनिक कथानक, मजबूत अभिनय आणि प्रेक्षकांशी जोडलेली कथा यामुळे ‘पारू’ने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली.
हे पण वाचा.. अपूर्वा नेमलेकरचा मालवणी अंदाज! भरलेलं पापलेट, कोळंबी फ्राय आणि आईसाठी खास सरप्राइज जेवण चर्चेत
१९ जानेवारीपासून झी मराठीवर दोन महत्त्वाचे बदल पाहायला मिळणार आहेत. संध्याकाळी ७ वाजता ‘शुभ श्रावणी’ नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येईल, तर रात्री ११ वाजता Paaru आपल्या चाहत्यांना भेटत राहील. त्यामुळे पारूचे चाहते निर्धास्तपणे आपल्या आवडत्या मालिकेचा आनंद नव्या वेळेत घेऊ शकणार आहेत.
हे पण वाचा.. सावळ्याची जणू सावली मधील तारा म्हणजेच भाग्यश्री दळवीचा डान्स व्हिडीओ चर्चेत, चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद









