15 जुलैपासून YouTube मोठं पाऊल उचलत असून, कॉपी-पेस्ट किंवा रिपिटेटिव्ह व्हिडीओ टाकणाऱ्यांची कमाई थांबणार आहे. नवीन पॉलिसीनुसार केवळ ओरिजिनल, क्रिएटिव्ह आणि प्रामाणिक youtube videos वरच कमाई होईल, तर इतरांचा कंटेंट वापरल्यास थेट आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे.
Table of Contents
मुंबई : YouTube वर आता कॉपी केलेले किंवा एकाच प्रकारचे पुन्हा पुन्हा अपलोड केलेले व्हिडीओ टाकून पैसे कमवायचे दिवस संपले आहेत. 15 जुलै 2025 पासून YouTube आपल्या Partner Program मध्ये मोठा बदल करत आहे. नव्या पॉलिसीनुसार, जे क्रिएटर्स रिपिटेटिव्ह, कॉपी केलेले किंवा मॅस-प्रोड्यूस्ड कंटेंट तयार करतात, त्यांना प्लॅटफॉर्मवरून कोणतीही कमाई करता येणार नाही.
YouTube ने यासंदर्भात अधिकृत माहिती देत स्पष्ट केले आहे की, प्लॅटफॉर्मवर केवळ ओरिजिनल, क्रिएटिव्ह आणि प्रामाणिक कंटेंटलाच प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे जे युट्युब क्रिएटर्स फक्त इतरांचा व्हिडीओ एडिट करून, स्लाईडशो तयार करून किंवा एखाद्या दुसऱ्याचा कंटेंट थोड्या फार बदलांसह पुन्हा अपलोड करतात, त्यांची थेट कमाई बंद केली जाणार आहे.
गंभीर पाऊल उचलले YouTube ने
YouTube हा जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे आणि दररोज लाखो youtube videos अपलोड केले जातात. मात्र यापैकी अनेक व्हिडीओ हे रिपीटेड, कमी दर्जाचे किंवा इतर क्रिएटर्सचा कंटेंट एडिट करून तयार केलेले असतात. अशा प्रकारामुळे ओरिजिनल कंटेंट तयार करणाऱ्या खऱ्या क्रिएटर्सला नुकसान होत आहे. त्यामुळेच YouTube ने आपली पॉलिसी कडक करत 15 जुलैपासून ही नवी अंमलबजावणी जाहीर केली आहे.
हे पण वाचा ..google photos अॅपमध्ये मोठे बदल; QR शेअरिंग आणि अल्बम डिझाईनमध्ये नवता
कशावर बंदी, कोणते व्हिडीओ कमाईसाठी पात्र?
YouTube च्या नव्या नियमांनुसार, ज्या व्हिडीओंमध्ये खालील गोष्टी असतील त्यांच्यावर थेट कमाईचा बंदोबस्त केला जाईल :
1.रिपिटेटिव्ह व्हिडीओ किंवा एकाच प्रकारचा कंटेंट पुन्हा पुन्हा अपलोड करणं
2.इतर कोणाचा व्हिडीओ एडिट करून स्वतःचा म्हणून टाकणं
3.AI जनरेटेड व्हिडीओ, स्लाईडशो किंवा बिनमहत्त्वाचा Mashup व्हिडीओ
4.Clickbait किंवा केवळ व्यूज मिळवण्यासाठी तयार केलेला हलक्या दर्जाचा कंटेंट
याउलट जे क्रिएटर्स खालील प्रकारचे ओरिजिनल youtube videos तयार करतात त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे :
1.शैक्षणिक व्हिडीओ, जे ज्ञान देणारे असतील
2.मनोरंजनपर व्हिडीओ, जे नव्या कल्पकतेतून साकारलेले असतील
3.स्वतःचा आवाज, व्हिज्युअल्स, आणि कोणताही भाग दुसऱ्याचा नसलेला कंटेंट
कमाईसाठी आवश्यक पात्रता काय?
YouTube Partner Program मध्ये सहभागी होण्यासाठी क्रिएटर्सना काही किमान पात्रता निकष पूर्ण करावे लागणार आहेत :
किमान 1,000 सब्स्क्राइबर्स
गेल्या 12 महिन्यांत 4,000 public watch hours
किंवा
गेल्या 90 दिवसांत 10 मिलियन Shorts views
हे निकष पूर्ण झाल्यानंतर YouTube तुमच्या कंटेंटची सत्यता आणि ओरिजिनॅलिटी तपासेल. जर तुमचा कंटेंट कॉपी, रिपीटेड किंवा कमी दर्जाचा असेल तर थेट कमाईवर दंड बसणार आहे.
YouTube च्या नव्या धोरणाचा उद्देश काय?
YouTube च्या मते, खरे आणि मेहनतीने कंटेंट तयार करणाऱ्या क्रिएटर्सना प्रोत्साहन देणं, हेच या नव्या पॉलिसीमागचं मुख्य कारण आहे. आज YouTube वर अनेक फेक, Clickbait किंवा केवळ व्यूजसाठी तयार होणारे व्हिडीओ सापडतात, जे यूट्युबच्या दर्जाला धक्का पोहोचवतात.
आता कंपनीचं लक्ष्य एक दर्जेदार, क्रिएटिव्ह आणि प्रामाणिक कंटेंट इकोसिस्टम तयार करणं आहे. त्यामुळे जे क्रिएटर्स केवळ दुसऱ्याचा व्हिडीओ एडिट करून किंवा एकाच फॉर्मॅटचे youtube videos तयार करत होते, त्यांना आता आर्थिक फटका बसणार आहे.
हे पण वाचा ..Nothing Phone 3 जुलैमध्ये लॉन्च होणार..!
15 जुलैनंतर काय बदलणार?
15 जुलै 2025 पासून ही नवी पॉलिसी लागू होईल. सध्या YouTube ने अधिकृत पेजवर या बदलांची सविस्तर माहिती दिली आहे. अंमलबजावणी कशी होईल याचा तपशील कंपनी लवकरच स्पष्ट करणार आहे. मात्र याआधीच क्रिएटर्सनी आपला कंटेंट तपासावा आणि ओरिजिनल Content तयार करण्यावर भर द्यावा, असं YouTube ने सूचित केलं आहे.
youtube videos वर मेहनत घ्या, नाहीतर कमाई गमावाल!
शेवटी, youtube videos वर जर तुम्ही स्वतःचा आवाज, विचार, क्रिएटिव्हिटी आणि मेहनत लावत असाल तर ही नवी पॉलिसी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पण जर तुम्ही फक्त इतरांचा व्हिडीओ एडिट करून, एकाच प्रकारचे स्लाईडशो किंवा Mashup तयार करत असाल, तर यापुढे प्लॅटफॉर्मवरून पैसे मिळवणं कठीण होणार आहे.
YouTube च्या या नव्या धोरणामुळे ओरिजिनल Content तयार करणाऱ्यांना मोठं व्यासपीठ मिळणार आहे, तर Copy-Paste करणाऱ्यांसाठी आव्हानात्मक काळ सुरू होणार आहे.
youtube videos वर मेहनत करा, नवीन काहीतरी द्या आणि तुमच्या क्रिएटिव्हिटीतूनच यश मिळवा, हेच YouTube चं स्पष्ट संकेत आहे.