ADVERTISEMENT

येड लागलं प्रेमाचं मालिकेत बिबट्याची एंट्री; नव्या प्रोमोवर प्रेक्षकांची जोरदार चर्चा

yed lagla premach latest promo leopard entry : येड लागलं प्रेमाचं मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अचानक दाखवलेल्या बिबट्यामुळे सोशल मीडियावर कमेंट्सची बरसात; राया-मंजिरीच्या लग्नाच्या ट्रॅकमध्ये हा ट्विस्ट पाहून प्रेक्षक थक्क.
yed lagla premach latest promo leopard entry

yed lagla premach latest promo leopard entry : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका येड लागलं प्रेमाचं (Yed Lagla Premach) सध्या अनपेक्षित वळणावर पोहोचली असून नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण आलं आहे. राज्यभरात सुरू असलेल्या बिबट्यांच्या हालचाली आणि गावांमध्ये वाढलेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर मालिकेत दाखवलेला हा ट्विस्ट अनेकांना आश्चर्यचकित करून गेला आहे.

मालिकेत राया आणि मंजिरीच्या लग्नाची तयारी जोरात सुरू असून गावात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र या आनंदाच्या वातावरणात अचानक नवा धक्का बसतो. नव्या प्रोमोमध्ये मेहेंदी समारंभाची लगबग दाखवली आहे. या दरम्यान मेहेंदी आणायला गेलेला निखिल वेळेत न परतल्याने मंजिरीला काळजी वाटू लागते. घरचा दरवाजा ठोठावला जाताच निखिल जखमी अवस्थेत दिसतो आणि त्याच्यावर कुणीतरी हल्ला केल्याचा संशय व्यक्त होतो.

राया निखिलच्या जखमा पाहून हा हल्ला एखाद्या माणसाकडून नाही तर जंगली प्राण्याकडून झाल्याचं ओळखतो. तेवढ्यात प्रोमोमध्ये बिबट्याचं दर्शन होतं आणि गावात खरोखरच बिबट्या घुसल्याची शक्यता समोर येते. आता हा बिबट्या गावकऱ्यांसाठी किती धोकादायक ठरणार आणि राया यातून सर्वांचं रक्षण कसं करणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

मात्र या रोमांचक दृश्यांइतकाच चर्चेचा विषय ठरला तो ट्रोलिंगचा. प्रेक्षकांनी प्रोमो पाहताच सोशल मीडियावर विनोदी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “बिबट्या ट्रेंडमध्ये आहे म्हणून मालिकेत आणला का?”, “लग्नाचं निमंत्रण नाही दिलं म्हणून स्वतः आला”, “सांगलीचा बिबट्या शूटिंगलाही पोचला”, अशा अनेक विनोदी प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही जणांनी तर “काय राव, आता सिरियलमध्येही बिबट्या येतोय?” असं म्हणत मालिकेच्या निर्मात्यांना टोला लगावला आहे.

हे पण वाचा.. सावळ्याची जणू सावली मालिकेत नवा कलाटणीचा इशारा; सावलीच्या आवाजाचं गुपित उघड होणार?

तरीसुद्धा, या नव्या ट्वीस्टमुळे येड लागलं प्रेमाचं मालिकेबद्दलची उत्सुकता मात्र अधिकच वाढली आहे. गावात दाखल झालेल्या या बिबट्यामुळे पुढील भागांमध्ये काय घडणार, राया कोणती पावलं उचलणार आणि मंजिरी-रायाचं लग्न यामुळे अडचणीत येणार का, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. मालिकेची टीम प्रेक्षकांचं मनोरंजन कायम ठेवण्यासाठी अशा अनपेक्षित ट्रॅकचा वापर करत असल्याचं स्पष्ट दिसतं.

हे पण वाचा.. गिरिजा ओक ने सांगितला लोकलमधला धक्कादायक अनुभव; ‘थेरपी शेरपी’च्या मुलाखतीत उलगडले अनेक किस्से

yed lagla premach latest promo leopard entry