Words that changed Abhinay Berde acting path : मराठी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता Abhinay Berde विविध भूमिका आणि प्रयोगशील कामासाठी ओळखला जातो. ‘ती सध्या काय करते’, ‘रंपाट’, ‘मन कस्तुरी रे’, ‘सिंगल’, ‘बॉईज ४’ यांसारख्या चित्रपटांमधून त्याने तरुणाईत विशेष लोकप्रियता मिळवली. मात्र या प्रवासात केवळ कौतुकच नाही, तर थेट आणि कठोर टीकाही त्याच्या वाट्याला आली आहे, तीही अगदी घरातूनच.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत Abhinay Berde याने स्वतःच कबूल केलं की, त्याची आई आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे ही त्याची सर्वात मोठी टीकाकार आहे. एखादं काम तिला आवडलं नाही, तर ती कोणतीही भीड न ठेवता ते स्पष्टपणे सांगते. अभिनय खराब वाटला, तर “घाणेरडं काम केलं आहेस” असंही ती थेट बोलते, असं अभिनयनं स्पष्ट केलं.
या सगळ्यात सर्वात जास्त धक्का देणारी गोष्ट म्हणजे आईनेच त्याला “तू अभिनेता म्हणून शून्य आहेस” असं सांगितलं होतं. त्या शब्दांनी त्या क्षणी वाईट वाटल्याचं तो मान्य करतो. पण आज मागे वळून पाहताना, तेच शब्द त्याच्या जडणघडणीसाठी महत्त्वाचे ठरले, असं तो सांगतो. त्या वाक्यामुळेच स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहण्याची आणि स्वतःवर अधिक मेहनत घेण्याची प्रेरणा मिळाली.
Abhinay Berde पुढे सांगतो की, तो काळ लॉकडाऊनपूर्वीचा होता. त्या काळात तो घरीच अधिक वेळ घालवत होता आणि बाहेरच्या घडामोडींपासून थोडा दूर होता. अशा वेळी आईने दिलेला हा “रिअॅलिटी चेक” त्याच्यासाठी निर्णायक ठरला. तिनं त्याला स्पष्ट सांगितलं होतं की, त्याची तुलना कायमच वडील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी होणार आहे. त्या उंचीपर्यंत पोहोचणं शक्य होईल किंवा नाही, हा मुद्दा दुय्यम आहे; पण मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी स्वतःला सक्षम अभिनेता बनवणं महत्त्वाचं आहे.
आज Abhinay Berde च्या कामाकडे पाहिलं, तर या शब्दांचा परिणाम स्पष्टपणे दिसतो. या वर्षात तो रंगभूमीवर ‘आजीबाई जोरात’सारख्या नाटकातून प्रेक्षकांसमोर आला, तर ‘दशावतार’ या चित्रपटात त्याने नकारात्मक भूमिका साकारून वेगळा ठसा उमटवला. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘उत्तर’ या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. मोठ्या बजेटच्या चित्रपटांशी स्पर्धा असतानाही ‘उत्तर’ला मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
हे पण वाचा.. कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ फेम कांची शिंदेचं स्वप्न सत्यात! नव्या घरात आनंदात गृहप्रवेश
कधी काळी टोचणारे वाटलेले शब्द आज Abhinay Berde च्या आत्मविश्वासाची आणि मेहनतीची पायरी ठरले आहेत, हेच त्याच्या प्रवासाचं खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल.
हे पण वाचा.. सैराट’मधील इंटिमेट सीनवर रिंकू राजगुरू ने पहिल्यांदाच उघड केलं मनातलं; म्हणाली – भीती वाटली होती, पण…







