नव्या तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर Waaree Energies च्या समभागांमध्ये उसळी; गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण.
Table of Contents
मुंबई : नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाची खेळाडू ठरलेली waaree energies लिमिटेड आज, मंगळवारी 22 एप्रिल 2025 रोजी, आर्थिक वर्ष 2024-25 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली असून, गुंतवणूकदारांचा विश्वास दृढ झाला आहे.
एनएसईवर waaree energies चे समभाग आज 8.22% नी वधारून ₹2,645 या दराने बंद झाले. यामुळे कंपनीचा एकूण बाजार भांडवल ₹75,986.41 कोटींवर पोहोचला. आजच्या व्यवहारात एकूण 52.78 लाख समभागांची उलाढाल झाली असून, याचा एकूण व्यवहारमूल्य ₹1,362.32 कोटी इतका होता.
waaree energies ने 6 नोव्हेंबर 2024 रोजी ₹3,743 ची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत गाठली होती, तर 7 एप्रिल 2025 रोजी ₹1,863 नी सर्वात नीचांकी किंमत नोंदवली होती. आजच्या सत्रात कंपनीचे शेअर्स एकदा ₹2,629 पर्यंत गेले होते.
कंपनीच्या भारतातील प्रमुख ग्राहकांमध्ये आदित्य बिर्ला ग्रुप, एएमपी सोलर, अमरा राजा, सस्टेन, सुझलॉन, व उजास एनर्जी यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अल्दो एनर्जी, सेन्गिज होल्डिंग, एल्स एनर्जी, व टंक्समेटिक हे कंपनीचे ग्राहक आहेत.
हे पण वाचा..sensex nifty stock market तेजीची लाट! सलग पाचव्या सत्रात वाढ; sensex 1,000 अंशांवर झेपावला, nifty 24,150 च्या पातळीवर
आर्थिक निकाल जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर waaree energies ने डिसेंबर तिमाहीत (Q3 FY25) ₹5,068.76 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला होता, जो मागील वर्षी याच तिमाहीतील ₹1,408.05 कोटींच्या तुलनेत खूपच जास्त होता. एकूण महसूलही ₹35,452.65 कोटीवर पोहोचला होता, जो मागील वर्षीच्या ₹16,517.74 कोटींपेक्षा दुपटीहून अधिक आहे.
शेअरच्या इश्यू प्राइस ₹1,503 च्या तुलनेत सध्या शेअर ₹2,602 वर व्यवहार करत असून, 53.54% नी वधारले आहेत. गेल्या एका आठवड्यातच या समभागात तब्बल 14% वाढ झाली आहे.
कंपनीकडून एका अधिकृत पत्राद्वारे सांगण्यात आले की, “मारी तिमाहीचे व वार्षिक एकत्रित आर्थिक निकाल जाहीर करण्यासाठी 22 एप्रिल रोजी बोर्ड मीटिंग आयोजित केली आहे. तसेच, 23 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता विश्लेषक व गुंतवणूकदारांसाठी कॉन्फरन्स कॉल ठेवण्यात आली आहे.”
अमेरिकेच्या नवीन टॅरिफमुळे शेअर्सला बूस्ट
एनर्जी आणि प्रीमियर एनर्जीचे शेअर्स आज बाजारात 5% पर्यंत वधारले. अमेरिकेने दक्षिण-आशियातील काही देशांवर सौरपॅनलवरील आयातीवर उच्च दराचे टॅरिफ लावल्यामुळे या भारतीय कंपन्यांना फायदा झाला आहे.
अमेरिकेच्या नवीन निर्णयानुसार, कंबोडिया, मलेशिया, थायलंड आणि व्हिएतनामवर सौरसेल्सच्या आयातीवर 3,500% पर्यंत टॅरिफ लावण्यात आले आहे. चीनच्या अनुदानित उत्पादनामुळे अमेरिकेतील कंपन्यांचे नुकसान होत असल्याने ही कारवाई करण्यात आली.
या निर्णयामुळे भारतातील कंपन्यांना अमेरिकन बाजारपेठेत संधी उपलब्ध झाली असून, त्यामुळे वारी एनर्जीचे शेअर्स ₹2,574.45 पर्यंत पोहोचले. तर, प्रीमियर एनर्जीचे शेअर्स ₹1,035 पर्यंत वाढले. वारी ही भारतातील सर्वात मोठी सोलर PV मॉड्यूल उत्पादक कंपनी असून, 13.3 GW ची उत्पादन क्षमता आहे. तिचे चार मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स देशात असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिचे अस्तित्व आहे.
भविष्यातील संधी व आव्हाने
तांत्रिक विश्लेषकांच्या मते, सौरऊर्जा हे जागतिक स्तरावर सर्वात कमी किमतीचे ऊर्जा स्त्रोत ठरत आहे. 2022 मध्ये 1,064 GW असलेली सौर क्षमता 2028 पर्यंत 2,733 GW होणार असून, सौर ऊर्जा 2026 पर्यंत नैसर्गिक गॅस व 2027 पर्यंत कोळशाला मागे टाकेल, असा अंदाज आहे.
दुसरीकडे, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीजने Q3 FY25 मध्ये ₹53.48 कोटींचा नफा जाहीर केला, जो मागील वर्षाच्या ₹64.23 कोटींपेक्षा 16.74% नी कमी आहे. मात्र, कंपनीचे unexecuted ऑर्डर बुक Q3 मध्ये 3,398 MWp वर गेला आहे, जो Q2 मधील 1,702 MWp च्या तुलनेत 99% नी वाढला आहे.
waaree energies नजर निकालांकडे
गुंतवणूकदार आणि बाजारातील तज्ज्ञांचे लक्ष आता waaree energies च्या अधिकृत आर्थिक निकालांवर केंद्रित झाले आहे. Q3 मध्ये ज्या प्रकारे कंपनीने उत्तम कामगिरी केली होती, त्याच प्रकारची कामगिरी Q4 मध्येही झाली असल्यास, समभागात आणखी तेजी पाहायला मिळू शकते. सध्या भारतीय सौरऊर्जा क्षेत्राला जागतिक घडामोडींचा फायदा होत असून, वारी एनर्जी याचा पुरेपूर लाभ घेऊ शकते.
हे पण वाचा ..icici bank नफा 18% ने वाढला; शेअर नवीन उच्चांकावर – गुंतवणुकीसाठी उत्तम संधी?