मुंबईत स्वतःचं घर असणं हे अनेकांचं स्वप्न असतं. विशेषतः मनोरंजन विश्वातील कलाकारांसाठी हे स्वप्न पूर्ण करणं म्हणजे एक मोठी उपलब्धी मानली जाते. आणि हेच स्वप्न आता लोकप्रिय मराठी अभिनेता Vivek Sangle याने पूर्ण केलं आहे. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेला हा अभिनेता आता प्रत्यक्षात मुंबईकर झालेला आहे.
Vivek Sangle ने नुकतंच मुंबईच्या लालबाग-परळ परिसरात एक प्रशस्त फ्लॅट खरेदी केला असून, तिथं त्याने आपल्या कुटुंबासह गृहप्रवेश केला. विशेष म्हणजे, या नव्या घरात प्रवेश करताना विवेकने पारंपरिक पद्धतीने वास्तुशांती देखील केली आणि आई-वडिलांच्या उपस्थितीत हा खास क्षण साजरा केला.
Vivek Sangle ने साकारलेल्या ‘जीवा’च्या भूमिकेने त्याला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवलं आहे. पण त्याचं करिअर ‘देवयानी’, ‘आई माझी काळूबाई’, ‘भाग्य दिले तू मला’, ‘लव्ह लग्न लोचा’ अशा विविध मालिकांमधूनच घडत गेलं. त्याची मेहनत, सातत्य आणि अभिनयकौशल्य यामुळेच आज त्याने स्वतःचं हक्काचं घर उभं केलं आहे.
या नव्या घराचं इंटिरियरही तितकंच लक्षवेधक आहे. ‘Elements 5 Design Studio’ या इन्स्टाग्राम पेजवरून या घराची पहिली झलक चाहत्यांसमोर आली. प्रशस्त हॉल, फ्रेंच विंडो असलेली बाल्कनी आणि घरभर पसरलेली सौंदर्यपूर्ण साज-सजावट – या सगळ्यामुळे घराचं सौंदर्य खुलून आलं आहे. विशेष म्हणजे, लिव्हिंग रूममध्ये विवेकने आतापर्यंत मिळवलेले पुरस्कार अगदी नेटकेपणाने ठेवले आहेत, ज्यातून त्याचा अभिनयप्रवासही सहज दिसून येतो.
या शुभप्रसंगी Vivek Sangle चा जवळचा मित्र आणि अभिनेता संग्राम समेळही उपस्थित होता. सोशल मीडियावर विवेकच्या या गृहप्रवेशाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असून, चाहत्यांसह मराठी कलाविश्वातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Vivek Sangle सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. मृणाल दुसानिस, विजय आंदळकर, ज्ञानदा रामतीर्थकर, ऋजुता देशमुख आणि अविनाश नारकर यांसारखे कलाकारही या मालिकेत महत्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. दररोज संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेला चांगली लोकप्रियता लाभली असून, विवेकचा अभिनय विशेषतः प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.
हे पण वाचा..‘शिवा’ मालिकेचा शेवट होणार थरारक आणि भावनिक! अंतिम भागात खास पाहुण्या अभिनेत्रीची जबरदस्त एन्ट्री
वास्तविक पाहता, अशा यशाच्या टप्प्यावर पोहोचूनही विवेक सांगळेने आपली पायं जमिनीवर ठेवलेली आहेत. त्याच्या नवीन घराची झलक ही त्याच्या परिश्रमांची, कुटुंबप्रेमाची आणि स्वप्नपूर्तीची साक्ष देणारी आहे.









