ADVERTISEMENT

Vishal Nikam ची ‘मिस फायर’ला खास शुभेच्छा; ‘येड लागलं प्रेमाचं’ फेम पूजा बिरारीच्या वाढदिवशी भावनिक पोस्ट

'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत राया आणि मंजिरीची जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. या मालिकेतील नायक Vishal Nikam ने आपल्या ऑनस्क्रीन जोडीदार पूजा बिरारीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत तिला मनापासून शुभेच्छा दिल्या.
Vishal Nikam

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘येड लागलं प्रेमाचं‘ ही सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील राया आणि मंजिरीची जोडी घराघरांत पोहोचली आहे. मालिकेत राया साकारणारा Vishal Nikam आणि मंजिरीची भूमिका साकारणारी पूजा बिरारी यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना भुरळ घालत असली, तरी त्यांच्या ऑफस्क्रीन मैत्रीचीही चर्चा तितकीच रंगते.

अलीकडेच पूजा बिरारीच्या वाढदिवसानिमित्त Vishal Nikam ने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने पूजाला “रायाची मिस फायर आणि विशालची अत्यंत चांगली मैत्रीण” असे संबोधत, मनापासून शुभेच्छा दिल्या. Vishal Nikam ने लिहिलं, “९ ऑगस्ट म्हणजे तुझा दिवस! तुला हव्या त्या सगळ्या गोष्टी मिळोत, तुझ्या चेहऱ्यावर नेहमी हसू राहो, आणि तुझं आयुष्य आनंदात जावो.”

या पोस्टसोबत Vishal Nikam ने दोघांचे काही खास फोटो देखील शेअर केले. विशेष म्हणजे हे फोटो मालिकेतील खलनायक इन्सपेक्टर घोरपडेची भूमिका करणाऱ्या संग्राम साळवी यांनी टिपले आहेत. फोटो शेअर करताना विशालने थट्टेखोर अंदाजात लिहिलं, “हुश्श!! केवढं लिहिलं मी आज… आता पार्टी तर बनतेच. गिफ्ट काय पाहिजे ते सांग!”

पोस्ट पाहून नेटकऱ्यांनीही मोठ्या संख्येने प्रतिक्रिया दिल्या. “मैत्री असावी तर अशीच”, “राया आणि मिस फायर अप्रतिम दिसता”, “सच्चा दोस्त”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या. अनेकांनी दोघांच्या केमिस्ट्रीचं कौतुक करत मैत्री कायम टिकावी अशी शुभेच्छा दिल्या.

हे पण वाचा.. ‘मॅडम-दादा’ म्हणत अपघातातून सुरू झालेली फिल्मी लव्हस्टोरी  Prajakta Gaikwad ने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा

दरम्यान, ‘येड लागलं प्रेमाचं‘ मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर दररोज रात्री १० वाजता प्रसारित होते. Vishal Nikam च्या करिअरकडे पाहिल्यास, त्याने ‘साता जन्माच्या गाठी’, ‘दक्खनचा राजा ज्योतिबा’, ‘आई मायेचं कवच’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय त्याने ‘मिथुन’, ‘धुमस‘, आणि ‘बलोच‘ या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

Vishal Nikam ची लोकप्रियता ‘बिग बॉस मराठी’मुळे आणखी वाढली. तो या रिअॅलिटी शोच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला होता. आज त्याची ओळख केवळ एक गुणी अभिनेता म्हणून नाही, तर एक मनमिळावू आणि मित्रधर्मी व्यक्ती म्हणूनही आहे.

पूजा बिरारी आणि विशाल निकमची ऑन-ऑफस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांसाठी एक खास आकर्षण ठरते आहे. वाढदिवसाच्या या पोस्टमुळे त्यांच्या मैत्रीची गोष्ट पुन्हा एकदा चर्चेत आली असून, चाहत्यांनी या सुंदर मैत्रीचे फोटो मनसोक्त शेअर आणि लाईक केले आहेत.

हे पण वाचा.. Tharala Tar Mag : सायलीच्या आनंदावर कल्पनाची घाला, नागराजची हातचलाखी; बायको-वहिनीवर खोटा आळ

Vishal Nikam पोस्ट..