Vin Doghantali Hi Tutena : तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेची टेलिव्हिजनवरची पहिली जोडी ‘वीण दोघांतली ही तुटेना’मधून प्रेक्षकांना भावणार आहे. मालिकेचं कथानक, पात्रांची नावं आणि लेखिका कोण आहेत, जाणून घ्या सविस्तर.
वीण दोघांतली ही तुटेना’ : तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेच्या नव्या मालिकेचं कथानक चर्चेत!
Vin Doghantali Hi Tutena : मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान लवकरच नवीन मालिकेसह छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतून प्रेक्षकांना तेजश्री आणि बहुप्रतिभावान अभिनेता सुबोध भावे यांची जोडी पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोला जबरदस्त प्रतिसाद मिळत असून या मालिकेबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हे पण वाचा..Rinku Rajguru ची ‘डेट’ चर्चेत! खास वेळ काढत शेअर केले फोटो..कोणाला करतेय डेट सोशल मिडियावर रंगली चर्चा
या मालिकेत तेजश्री स्वानंदी सरपोतदार ही व्यक्तिरेखा साकारत आहे. ३५ वर्षीय स्वानंदी ही एक जबाबदार, कुटुंबासाठी स्वतःचं आयुष्य झोकून देणारी स्त्री आहे. प्रेम, लग्न या गोष्टी तिनं स्वतःपासून दूर ठेवल्या आहेत, कारण कुटुंबाच्या सुखासाठी तिने स्वतःला वाहून घेतलं आहे. दुसरीकडे सुबोध भावे समर राजवाडेची भूमिका साकारत आहे – एक यशस्वी व्यावसायिक, मनानं संवेदनशील आणि आपल्या भावंडांचा आधार बनलेला एक कुटुंबवत्सल माणूस
कथानकाचं विशेष म्हणजे, स्वानंदी आणि समर या दोघांच्या आयुष्यात एक अनपेक्षित टप्पा येतो, ज्यात कुटुंबाच्या सुखासाठी ते एकत्र येण्याचा निर्णय घेतात. जे लग्न सुरुवातीला तडजोड म्हणून होतं, ते पुढे समजुतीचं आणि जिव्हाळ्याचं नातं बनतं.
हे पण वाचा.. Jui Gadkari खऱ्या आयुष्यात किती ‘गुंडी’? ऑनस्क्रीन मैत्रीण दिशाची धमाल पोलखोल!
या मालिकेचं दिग्दर्शन चंद्रकांत गायकवाड यांनी केलं असून लेखनाची सूत्रं लोकप्रिय अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी आणि मुग्धा गोडबोले यांच्या हातात आहेत. विशेष म्हणजे, या मालिकेचं लेखन करणारी अभिनेत्री ही स्वतः मराठी मनोरंजन क्षेत्रातील ओळखीचं नाव आहे, यामुळेही प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
याशिवाय मालिकेत राज मोरे (नवरी मिळे हिटलरला फेम) स्वानंदीच्या भावाची भूमिका साकारत आहे, तर समरच्या बहिणीच्या भूमिकेत पूर्णिमा डे दिसणार आहे. ही नवी मालिका ११ ऑगस्टपासून संध्याकाळी ७:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.









