vijay andalkar rupali zhankar love story marathi : मराठी मालिकाविश्वात सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतील पार्थच्या भूमिकेमुळे अभिनेता Vijay Andalkar चर्चेत आहे. पडद्यावर ज्ञानदा रामतीर्थकरसोबत त्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना मोहवून टाकते. पण पडद्यामागे विजयच्या खऱ्या आयुष्यातही एक सुंदर प्रेमकहाणी दडलेली आहे, जी आता सर्वांसमोर आली आहे. विजय आंदळकर आणि अभिनेत्री रुपाली झणकर यांनी त्यांच्या आयुष्यातील प्रेमाचा प्रवास खुला करत चाहत्यांना भावुक केलं आहे.
दिवाळीनिमित्त दिलेल्या एका खास मुलाखतीत या दोघांनी त्यांच्या नात्याविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला. रुपालीने सांगितलं, “आम्ही एकत्र एका मालिकेत काम करत होतो तेव्हाच मला विजय आवडायला लागला. त्याचं ‘वर्तुळ’ मालिकेतील काम मी कॉलेजमध्ये असताना पाहिलं होतं, तेव्हाच तो एक चांगला कलाकार वाटला.”
रुपाली आणि विजयमध्ये तब्बल १२ वर्षांचं वयाचं अंतर आहे, मात्र या दोघांना त्याचा कधीच अडथळा जाणवला नाही. रुपाली म्हणते, “आमचं नातं इतकं सहज आणि नैसर्गिक होतं की वयाचा फरक कधी जाणवलाच नाही. हळूहळू आम्ही अधिक बोलू लागलो आणि कधी प्रेमात पडलो हेच कळलं नाही.”
विजय आंदळकरने या प्रेमप्रवासाचा एक मजेशीर किस्सा सांगितला. “त्या मालिकेचे निर्माते तिचे काका होते. त्यांनी मला सांगितलं की, ती तुझ्या प्रेमात आहे, थोडं लांब राहा. मी हसून घेतलं, पण नंतर समजलं की खरंच ती मला आवडायला लागली आहे.”
रुपाली म्हणते, “मला तो खूप आवडायचा, पण पुढाकार घेण्याची हिंमत माझ्यात नव्हती. शेवटी विजयनेच तो घेतला.” विजय पुढे म्हणतो, “आईनेच मला सांगितलं की तिला विचार, तर मी थेट विचारलं — ‘आईने सांगितलंय की तू लग्न करशील का?’ ती हसली आणि हो म्हणाली!”
त्यांच्या लग्नाच्याही आठवणी वेगळ्याच आहेत. विजय हसत सांगतो, “रुपालीचे वडील खूप काटेकोर होते. त्यांनी घराची कागदपत्रं, जमीनसंपत्ती सगळं तपासलं. लॉकडाऊनच्या काळात लग्न ठरलं आणि फारशी तयारी न करताच आम्ही लग्न केलं.”
हे पण वाचा.. प्रियंका तेंडुलकरचा स्वप्नपूर्तीचा क्षण – चाळीतून आलिशान 2BHK पर्यंत
आज दोघंही एकमेकांच्या साथीनं आनंदी संसार करत आहेत. पडद्यावर रोमॅंटिक भूमिकांमध्ये चमकणारा Vijay Andalkar, खऱ्या आयुष्यातही तितकाच भावनिक आणि प्रेमळ नवरा आहे. रुपालीसोबतचं त्याचं नातं मराठी कलाविश्वातील एक हटके, प्रेरणादायी आणि सुंदर प्रेमकहाणी म्हणून चाहत्यांच्या मनात घर करत आहे.
हे पण वाचा.. सिया पाटीलनं घेतलं पुण्यात नवं घर; दिवाळीच्या शुभमुहूर्तावर स्वतः केली देवपूजा, शेअर केली खास झलक









