ADVERTISEMENT

Riteish Deshmukh च्या ‘राजा शिवाजी’ मध्ये Vidya Balan ची खास भूमिका व्यक्त केल्या भावना; म्हणाली…

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या भव्य चित्रपटात विद्या बालनची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिने या भूमिकेबद्दल, रितेशसोबतच्या कामाच्या आठवणी आणि सेटवरील खास अनुभव उलगडले.
Vidya Balan

Riteish Deshmukh दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या भव्य चित्रपटात Vidya Balan ची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिने या भूमिकेबद्दल, रितेशसोबतच्या कामाच्या आठवणी आणि सेटवरील खास अनुभव उलगडले.

विद्या बालनचा ‘राजा शिवाजी’ अनुभव; रितेश देशमुखच्या दिग्दर्शनाबद्दल खास प्रतिक्रिया

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री Vidya Balan लवकरच एका ऐतिहासिक मराठी चित्रपटात झळकणार आहे. Riteish Deshmukh दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जात असून, यात विद्या बालन एक खास आणि महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

वेड’ या चित्रपटानंतर Riteish Deshmukh पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांसमोर ‘राजा शिवाजी’ घेऊन येत आहे. या चित्रपटातील कलाकारांचा भव्य मेळा पाहूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलीया देशमुख यांसारख्या कलाकारांसोबतच Vidya Balan या चित्रपटात झळकणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत Vidya Balan म्हणाली,
“हो, मी ‘राजा शिवाजी’चं शूटिंग पूर्ण केलं आहे. हा अनुभव खूपच जादुई होता. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित हा चित्रपट करताना मला प्रत्येक सीनमध्ये एक वेगळी ऊर्जा जाणवली. रितेशसोबत काम करण्याचा हा वेगळाच अनुभव होता. आम्ही यापूर्वी ‘हे बेबी’मध्ये एकत्र काम केलं आहे, पण या वेळी तो दिग्दर्शकाच्या भूमिकेत होता. दिग्दर्शक म्हणून त्याचं काम अत्यंत प्रभावी आहे. एक अभिनेता असल्यामुळे त्याला कलाकारांकडून नेमकं काय हवंय, हे अचूक कळतं आणि हे त्याच्या दिग्दर्शनात दिसून येतं.”

हे पण वाचा.. रणबीरच्या ‘रामायण’मध्ये Adinath Kothare ची दमदार एंट्री; ‘भरत’च्या भूमिकेबद्दल व्यक्त केल्या खास भावना

विद्या पुढे म्हणाली,
रितेशसोबतचे काही सीन शूट करताना मला जाणवलं की तो प्रत्येक तपशीलात किती परिपूर्णता आणतो. तो दिग्दर्शनाच्या प्रत्येक टप्प्यावर कलाकारांशी संवाद साधत राहतो आणि त्यांची कामगिरी अधिक चांगली कशी होईल यासाठी प्रयत्नशील असतो. अशा भव्य कलाकृतीचा भाग होण्याचा मला खूप आनंद आहे.”

या चित्रपटात संजय दत्तसुद्धा एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे. याबद्दल Vidya Balan म्हणाली,
“संजय दत्तसोबत पुन्हा एकदा काम करताना खूप छान वाटलं. ‘मुन्नाभाई’नंतर आम्ही इतक्या वर्षांनी एकत्र काम करत होतो. त्याला भेटताच मी त्याला मिठी मारली आणि ‘लगे रहो मुन्नाभाई, तुझ्यासारखा कोणीच नाही!’ असंही म्हटलं. संजयसोबतचा हा अनुभव अप्रतिम होता.”

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार असून त्याची भव्यता आधीच चर्चेचा विषय ठरत आहे. ऐतिहासिक कथानक, दमदार कलाकार आणि आकर्षक दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीसाठी नवा मैलाचा  ठरेल, अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे.

हे पण वाचा..“Ketki Chitale वादग्रस्त विधान: ‘मराठीत बोललं नाही तर भाषेला भोकं पडणार का?’”