ADVERTISEMENT

‘Veen Doghatli Hi Tutena’ मालिकेत नवा ट्विस्ट; स्वानंदी आणि समर पुन्हा समोरासमोर

झी मराठीवरील ‘Veen Doghatli Hi Tutena’ मालिकेत स्वानंदी आणि समर पुन्हा समोरासमोर येणार आहेत. अधिरा आणि रोहनच्या नात्यामुळे दोन्ही कुटुंबे एकत्र येतात आणि त्यातून उलगडतो नवा ट्विस्ट.
Veen Doghatli Hi Tutena

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘Veen Doghatli Hi Tutena’ अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर करू लागली आहे. या मालिकेत स्वानंदी आणि समर या दोन व्यक्तिरेखांच्या नात्यातील गुंतागुंत, त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे निर्माण होणारे तणाव आणि कौटुंबिक संघर्ष हे कथानक अधिक रंगतदार करत आहेत. आता Veen Doghatli Hi Tutena या मालिकेत आणखी एक मोठा ट्विस्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.

स्वानंदी ही प्रेमळ, समजूतदार आणि कुटुंबाशी नाळ जोडून ठेवणारी तरुणी आहे. आपल्या लहान भावाविषयी ती नेहमीच काळजीवाहू असते, तर वडिलांबद्दल आदर व्यक्त करताना दिसते. दुसरीकडे, समर हा आपल्या कुटुंबावर निस्सीम प्रेम करणारा, बहिण अधिरासाठी काहीही करायला तयार असलेला व्यक्ती आहे. मात्र त्याच्या विश्वासाचा गैरफायदा घेणारे नातेवाईक सतत घरातील वातावरण बिघडवतात. याच पार्श्वभूमीवर स्वानंदी आणि समर पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.

यापूर्वी त्यांच्या नात्यात वादाचे अनेक प्रसंग घडले. स्वानंदीच्या आईने समरवर खोटा आरोप करून त्याला पोलिसांपर्यंत खेचले होते, तर वृद्धाश्रमाच्या जमिनीच्या प्रश्नामुळेही त्यांच्यात दुरावा वाढला. या घटनांनी दोघांमधील कटुता वाढली, मात्र नियतीने पुन्हा त्यांना एकमेकांसमोर उभं केलं आहे.

Veen Doghatli Hi Tutena या मालिकेत समरची बहीण अधिरा आणि स्वानंदीचा भाऊ रोहन एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. त्यांच्या नात्याला पुढचं रूप देण्यासाठी दोन्ही कुटुंबे एकत्र येतात. इथेच खरी रंगत सुरू होते – अधिरा समरची ओळख स्वानंदीला करून देते आणि तेव्हा दोघांना मोठा धक्का बसतो. प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे स्वानंदी आश्चर्याने “तुम्ही?” असं म्हणते, तर समरही रोहनकडे पाहून तिची ओळख पटवतो.

हे पण वाचा.. ‘साधी माणसं’ फेम Supriya Pathare यांनी बाप्पाकडे व्यक्त केली खास इच्छा.. म्हणाल्या..

यानंतर समर आणि स्वानंदी यांची बाजूला चर्चा रंगते. समर आता भांडणं बाजूला ठेवून समजूतदारपणे वागण्याचा निर्णय घेतल्याचं सांगतो. तो स्पष्ट करतो की अधिरा आणि रोहनला त्यांच्या वादाबद्दल काहीही समजू द्यायचं नाही. त्यावर स्वानंदी ठामपणे उत्तर देते – “हे तुम्हाला मला सांगायची गरज नाही.” तिच्या या प्रत्युत्तरामुळे प्रसंग आणखी रंगतो.

झी मराठी वाहिनीने शेअर केलेल्या Veen Doghatli Hi Tutena या मालिकेच्या प्रोमोला कॅप्शन दिलं आहे – “पिंट्या दादा आणि नंदू ताईमधील गैरसमजाची वीण आता तरी दूर होईल का?” त्यामुळे मालिकेत पुढे काय घडतं, स्वानंदी आणि समर यांचं नातं पुन्हा जवळ येतं की आणखी गुंतागुंतीत जातं, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

हे पण वाचा.. “मी लग्न करेन तेव्हा सगळ्यांना सांगेन” – कृष्णराज महाडिकांसोबतच्या फोटोवर Rinku Rajguru ची पहिली प्रतिक्रिया

Veen Doghatli Hi Tutena प्रोमो..