ADVERTISEMENT

वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये सत्ताबदलाची नांदी? स्वानंदी-मल्लिका आमनेसामने!

veen doghatli hi tutena swanandi mallika face to face : Veen Doghatli Hi Tutena मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये स्वानंदी आणि मल्लिका यांच्यात थेट सामना पाहायला मिळणार आहे. सत्तेच्या गर्वावर स्वानंदीने दिलेलं प्रत्युत्तर मालिकेत नवा वळण घेऊन येणार आहे.
veen doghatli hi tutena swanandi mallika face to face

veen doghatli hi tutena swanandi mallika face to face : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका Veen Doghatli Hi Tutena सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मालिका सुरुवातीपासूनच वेगळ्या कथानकामुळे चर्चेत आहे. नात्यांमधील गुंतागुंत, तडजोडीचं लग्न आणि त्यातून निर्माण होणारे गैरसमज यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.

Veen Doghatli Hi Tutena मध्ये समर आणि स्वानंदीची गोष्ट केंद्रस्थानी आहे. दोघांचं लग्न प्रेमातून नव्हे, तर परिस्थितीमुळे झालेलं आहे. स्वानंदीचा भाऊ रोहन आणि समरची बहीण अधिरा यांचं एकमेकांवर प्रेम असून त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. मात्र रोहनने एक अट घातली—जोपर्यंत त्याची नंदू ताई म्हणजेच स्वानंदीचं लग्न होत नाही, तो स्वतः लग्न करणार नाही. यानंतर स्वानंदीसाठी अनेक स्थळं पाहण्यात आली. समरने स्वतः पुढाकार घेत तिच्यासाठी स्थळ शोधलं आणि एका मुलाशी लग्न ठरलंही.

मात्र साखरपुड्याच्या वेळी समरची काकू मल्लिकाने रचलेल्या कारस्थानामुळे हे लग्न मोडलं. त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत भावंडांच्या सुखासाठी समर आणि स्वानंदीने एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. स्वभाव, विचारसरणी आणि कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी असतानाही त्यांनी ही तडजोड स्वीकारली. पण हे नातं स्वीकारणं मल्लिकाला कधीच मान्य नव्हतं.

मल्लिकाला ना अधिराचं लग्न मध्यमवर्गीय कुटुंबात व्हावं असं वाटत होतं, ना स्वानंदी श्रीमंत घरात यावी, अशी तिची इच्छा होती. त्यामुळे तिने वारंवार समर आणि स्वानंदीमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. अनेकदा ती यात यशस्वीही झाली आणि समरच्या मनात स्वानंदी व तिचं कुटुंब पैशासाठी लोभी असल्याची शंका निर्माण झाली.

आता Veen Doghatli Hi Tutena च्या नव्या प्रोमोमध्ये पहिल्यांदाच स्वानंदी मल्लिकासमोर ठामपणे उभी राहताना दिसत आहे. “गेली २५ वर्षे इथे माझी सत्ता आहे,” असं मल्लिका म्हणताच स्वानंदी तिला थेट प्रत्युत्तर देते, “काकू, वेळीच सावरा… सत्ताबदल व्हायला २५ दिवसही पुरतात.” या संवादामुळे मालिकेत मोठा संघर्ष पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

हे पण वाचा.. विग नाही, माझेच केस! धनश्री काडगावरने केसांबाबतचा गैरसमज केला दूर

झी मराठीने हा प्रोमो शेअर करत “स्वानंदी आणि मल्लिका समोरासमोर” अशी कॅप्शन दिली असून, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली आहे. आता स्वानंदी मल्लिकाच्या कारस्थानांना थोपवणार का, समरला सत्य कळणार का आणि त्यांच्या नात्यातील गैरसमज दूर होणार का, हे पाहणं Veen Doghatli Hi Tutena च्या चाहत्यांसाठी खूपच रंजक ठरणार आहे.

हे पण वाचा.. मंजिरी ओक यांची १२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण; सोमनाथ दर्शनानंतर भावनिक अनुभव केला शेअर

veen doghatli hi tutena swanandi mallika face to face