ADVERTISEMENT

घटस्फोटाची नोटीस, छतावर गेलेली अधिरा आणि मल्लिकाचा डाव; वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट

veen doghatli hi tutena navin promo twist : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अधिरा-रोहनच्या नात्यावर गंभीर संकट दिसत असून मल्लिकाच्या कारस्थानामुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेलं आहे.
Veen Doghatli Hi Tutena Upcoming twist

Veen Doghatli Hi Tutena Upcoming twist : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळत आहे. स्वानंदी व समर आणि अधिरा व रोहन यांच्या नात्यात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, रोहन हा मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा आहे. श्रीमंत घरची अधिरा त्याच्या प्रेमात पडली. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी परिस्थिती अशी निर्माण झाली की रोहनची बहीण स्वानंदी आणि अधिराचा मोठा भाऊ समर यांना लग्न करावे लागले. लग्नाआधी आणि नंतर समर आणि स्वानंदी यांच्यात मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

समरची मोठी काकू मल्लिका सतत कट कारस्थान करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अधिरा आणि रोहनने वेगळे व्हावे, स्वानंदी आणि समर यांच्यात गैरसमज व्हावे असे तिला वाटते. त्यामुळे ते वेगळे होण्यासाठी ती सतत प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळते.

नुकतेच पाहायला मिळाले की रोहन जेव्हा संक्रांतीसाठी अधिराच्या माहेरी येत होता. त्यावेळी मल्लिकाने तिच्या मुलाच्या मदतीने त्याचा अपघात घडवून आणला.

आता या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की रोहन आणि स्वानंदी एकमेकांशी बोलत आहेत. स्वानंदी म्हणते, “तुझी बायको ती आता जास्त आता स्ट्रेसमध्ये आहे.” स्वानंदीचे बोलणे ऐकल्यानंतर रोहन म्हणतो, “मला याबद्दल कोणाशी काहीच बोलायचं नाही आणि अधिरालासुद्धा भेटायचं नाही.”

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की अधिराची आई मल्लिका काही पेपर घेऊन येते. ते पेपर अधिराला देत म्हणते, “रोहनने डिव्होर्सची नोटीस पाठविली आहे.” ते पेपर पाहिल्यानंतर अधिराला धक्का बसतो. ती स्वत:शीच म्हणते, “तो मला घटस्फोट देऊ शकत नाही.” त्यानंतर ती रागाने टेबलवरील साहित्य बाजूला फेकते.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की अधिरा टेन्शनमध्ये घराच्या छतावर जाते. मल्लिका समरला फोन करून घरी बोलावते आणि सांगते की अधिरा घरावरून उडी मारेन अशी धमकी देत असल्याचे सांगते. अधिरा रडत मला जगायचं नाही, असं म्हणते. तीचे ते बोलणे ऐकून स्वानंदीला धक्का बसतो.

हे पण वाचा.. वेड’च्या यशामागे जिनिलियाची मेहनत रितेश देशमुख यांचा खुलासा

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “अधिरा-रोहनचं नातं वाचवू शकती का समर आणि स्वानंदी…”. अशी कॅप्शन दिली आहे. दरम्यान, आता स्वानंदी आणि समर हे अधिरा आणि रोहनला पुन्हा एकत्र आणू शकतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे पण वाचा.. कुरळ्या केसांच्या नव्या लूकमध्ये तेजश्री प्रधानचा खास व्हिडीओ, चाहत्यांची मनापासून दाद

Veen Doghatli Hi Tutena Upcoming twist