झी मराठीवरील नवीन मालिका ‘Veen Doghantli Hi Tutena’ सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि बहुप्रतिभावान अभिनेता सुबोध भावे या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. नात्यांच्या गुंतागुंतीतून विणलेली ही कथा प्रेक्षकांना पहिल्याच भागापासून भावते आहे. मात्र, या मालिकेबाबत आणखी एक खास बाब म्हणजे तिचं शीर्षक गीत – ज्याला स्वर दिला आहे लोकप्रिय गायिका सावनी रविंद्र आणि सुप्रसिद्ध गायक अभिजीत सावंत यांनी.
विशेष म्हणजे, अभिजीत सावंत यांच्या कारकिर्दीतली ही एक वेगळीच नोंद आहे. ‘इंडियन आयडॉल’ या लोकप्रिय गायनस्पर्धेतून घराघरात पोहोचलेला आणि अनेक सुपरहिट गाणी देणारा हा गायक, पहिल्यांदाच एखाद्या मालिकेसाठी शीर्षक गीत गात आहे. स्वतः अभिजीतनेही या संधीला आपल्या २० वर्षांच्या संगीत प्रवासातील एक खास टप्पा म्हटलं आहे.
एका मुलाखतीत अभिजीत सावंत म्हणाला, “झी मराठीसारख्या प्रतिष्ठित वाहिनीसाठी शीर्षक गीत गाण्याची संधी मिळणं, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. ही माझ्या कारकिर्दीतली पहिलीच वेळ आहे की मी मालिकेसाठी शीर्षक गीत गायलंय. त्याहून विशेष म्हणजे, हे माझ्या २० वर्षांच्या संगीतप्रवासातलं एक वेगळं पान आहे.”
तो पुढे सांगतो, “हे गाणं प्रदर्शित होऊन काहीच दिवस झालेत आणि प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम पाहून मन आनंदित झालंय. गायकाची खरी जबाबदारी म्हणजे गाण्याला न्याय देणं, आणि आज प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादावरून वाटतंय की आपण ते साध्य केलं आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’चं हे शीर्षक गीत माझ्यासाठी नक्कीच स्मरणात राहील.”
हे पण वाचा.. १२ वर्षांनंतर पुन्हा तेजूचा आवाज बनले”; गायिका सावनी रवींद्रचा Veena Doghantli Hi Tutena’ मालिकेसाठी खास संदेश
या शीर्षक गीतात सावनी रविंद्रच्या मधुर आवाजाची साथ अभिजीतच्या भावपूर्ण गायकीला मिळाली आहे. दोघांचाही स्वर, गीताची भावना आणि मालिकेच्या कथानकाचा सूर एकत्र येऊन प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडत आहेत.
मालिकेच्या कथानकाबद्दल बोलायचं झालं तर, Veen Doghantli Hi Tutena’ ही नात्यांच्या जुळण्या-तुटण्याच्या भावनिक प्रवासावर आधारित आहे. तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्यासोबत सुलभा आर्या, शर्मिला शिंदे, भारती पाटील, किशोर महाबोले, पूर्णिमा डे, राज मोरे यांसारखे अनुभवी कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.
Veen Doghantli Hi Tutena ही मालिका दररोज रात्री ७:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते. आधीच कथा, अभिनय आणि दिग्दर्शनामुळे चर्चेत आलेल्या या मालिकेच्या यशात आता शीर्षक गीताचाही मोठा वाटा आहे. अभिजीत सावंतसारख्या लोकप्रिय गायकाची साथ मिळाल्याने गाण्याची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे.
२० वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच मालिकेसाठी गायनाचा अनुभव घेताना अभिजीतने स्वतःला एका नव्या स्वरूपात पाहिलं. प्रेक्षकांसाठीही ही एक वेगळीच मेजवानी ठरली आहे. ‘Veen Doghantli Hi Tutena’ मालिकेचं हे शीर्षक गीत पुढील अनेक वर्षं प्रेक्षकांच्या आठवणीत राहील, यात शंका नाही.
हे पण वाचा.. गंजलेल्या नंबरप्लेटसह पोलिसांची व्हॅन; Shashank Ketkar ने उपस्थित केले प्रश्न, म्हणाला..









