ADVERTISEMENT

माज उतरणार का?” वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत अंशुमनचा खरा चेहरा उघड करण्यासाठी स्वानंदीचा मास्टर प्लॅन

वीण दोघांतली ही तुटेना या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत अंशुमनचा माज वाढतच चालला आहे. मात्र आता स्वानंदी त्याचा पर्दाफाश करण्यासाठी ठामपणे मैदानात उतरली असून नवीन प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
veen doghantli hi tutena swandi anshuman exposed

veen doghantli hi tutena swandi anshuman exposed : झी मराठीवरील Veen Doghantli Hi Tutena ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत आहे. तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या दमदार अभिनयामुळे ही मालिका दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय ठरत आहे. कुटुंब, नातेसंबंध, संघर्ष आणि सत्यासाठीचा लढा अशा अनेक भावनांचा मेळ या कथेत पाहायला मिळतो. सध्याच्या ट्रॅकमध्ये मात्र अंशुमनच्या वागणुकीमुळे कथानकाला वेगळंच वळण मिळालं आहे.

स्वानंदीने परिस्थितीपुढे झुकत समरसोबत लग्न केलं असलं, तरी तिचं आयुष्य अजिबात सोपं राहिलेलं नाही. समरची काकी मल्लिका या नात्याला सुरुवातीपासूनच विरोध करत असून, तिच्या प्रत्येक हालचालींमागे काहीतरी डाव असल्याचं स्पष्ट दिसतं. या सगळ्यात मल्लिकाचा मुलगा अंशुमनही तितकाच धोकादायक ठरतो आहे. समरच्या कंपनीत घोटाळे करत स्वतःचा फायदा करून घेणारा अंशुमन आता स्वानंदीच्या नजरेत खुपतो.

स्वानंदीला अंशुमनच्या हालचाली संशयास्पद वाटू लागतात आणि ती त्याचा खरा चेहरा समरसमोर आणण्याचा प्रयत्न करते. मात्र प्रत्येक वेळी अंशुमन अतिशय हुशारीने परिस्थिती हाताळतो आणि शेवटच्या क्षणी डाव उलटवतो. आगामी ३ आणि ४ जानेवारीच्या भागांमध्ये हा संघर्ष अधिक तीव्र होणार आहे. राजवाडेंच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या श्वेताला अंशुमन अश्लील संदेश पाठवतो, ही बाब स्वानंदी समरच्या कानावर घालते. सत्य समोर येईल, अशी अपेक्षा असतानाच अंशुमन स्वतःला वाचवण्यासाठी नवा कट रचतो.

समर जेव्हा श्वेताला थेट विचारतो, तेव्हा ती सत्य लपवते आणि स्वानंदीवरच संशय निर्माण होईल, असं खोटं सांगते. यामुळे समर संतापतो आणि ऑफिसमध्ये खोटं बोलणाऱ्याला स्थान नाही, असं स्पष्ट करत श्वेताला राजीनामा देण्यास सांगतो. इथेच कथा आणखी वेग घेते. झी मराठीने शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये स्वानंदी अंशुमनला थेट आव्हान देताना दिसते. “आजचा दिवस तुझा होता,” असं ती ठामपणे सांगते, तर अंशुमनही उद्धटपणे उत्तर देतो.

हे पण वाचा.. कमळीला फसवायचा डाव पडला अंगावर! पार्टीत अनिकाची फजिती

या सगळ्यानंतर स्वानंदी, श्वेता आणि निकिता एकत्र येतात आणि अंशुमनचा पर्दाफाश करण्यासाठी ठोस प्लॅन आखतात. त्यामुळे Veen Doghantli Hi Tutena मध्ये आता सत्य विरुद्ध खोटं असा थरारक सामना रंगणार हे निश्चित. स्वानंदी अंशुमनचा माज उतरवणार का, की तो पुन्हा एकदा सुटणार? हे पाहणं प्रेक्षकांसाठी अत्यंत रोमांचक ठरणार आहे.

हे पण वाचा.. सिक्स पॅक ॲब्ससह उमेश कामतचा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, फोटो झाले व्हायरल

veen doghantli hi tutena swandi anshuman exposed