ADVERTISEMENT

वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत स्त्री सन्मानासाठी स्वानंदीचा मोठा निर्णय अंशुमनचा खरा चेहरा उघड होणार?

veen doghantali hi tutena swanandi anshuman truth : वीण दोघांतली ही तुटेना मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे कथानकाला वेगळं वळण मिळालं आहे. अंशुमनचं खरे रूप उघड करण्यासाठी स्वानंदी निर्णायक पाऊल उचलणार असल्याचं संकेत मिळत आहेत.
veen doghantali hi tutena swanandi anshuman truth

veen doghantali hi tutena swanandi anshuman truth : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका Veen Doghantali Hi Tutena सध्या जोरदार चर्चेत आहे. मालिकेतील प्रत्येक नवा ट्विस्ट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असून पुढे काय घडणार, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. समर आणि स्वानंदी यांच्या नात्याभोवती फिरणारी ही कथा आता एका गंभीर सामाजिक मुद्द्यावर येऊन पोहोचली आहे.

मालिकेत दाखवल्याप्रमाणे, समर आणि स्वानंदी दोघांनाही आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम आहे. कुटुंबाच्या आनंदासाठी त्यांनी स्वतःच्या भावना बाजूला ठेवत लग्नाचा निर्णय घेतला. मात्र लग्नानंतर त्यांचं नातं सोपं राहिलेलं नाही. सततचे गैरसमज, वाद आणि तणाव यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. या सगळ्यामागे समरची काकू मल्लिका आणि तिचा मुलगा अंशुमन यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

मल्लिकाला स्वानंदी आणि तिचं कुटुंब मुळातच नको आहे. स्वानंदी राजवाडे कुटुंबाची सून होऊ नये, यासाठी ती सातत्याने कारस्थाने करताना दिसते. यापूर्वी समर आणि स्वानंदी बाहेर फिरायला गेले असताना त्यांच्या अपघातामागेही मल्लिकाच होती, हे प्रेक्षकांनी पाहिलं आहे. मात्र दोघेही त्या प्रसंगातून थोडक्यात बचावले.

अंशुमनही आईच्या पावलावर पाऊल टाकत ऑफिसमध्ये गैरप्रकार करत आहे. समरच्या नकळत तो कंपनीचे पैसे लाटतोय, हे हळूहळू समोर येत आहे. याचबरोबर आता त्याचं आणखी एक धक्कादायक रूप उघड झालं आहे. श्वेता नावाच्या एका कर्मचाऱ्याला तो कामाच्या नावाखाली त्रास देत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. ऑफिस संपल्यानंतरही तिला थांबवून ठेवणं, दबाव टाकणं, हे सगळं तो करत असल्याचं दिसतं.

श्वेताने समरकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला, मात्र अंशुमनच्या धमकीमुळे ती सत्य सांगू शकली नाही. याच टप्प्यावर स्वानंदी कथेत सक्रिय होताना दिसणार आहे. Veen Doghantali Hi Tutena च्या नव्या प्रोमोमध्ये स्वानंदी अंशुमन आणि श्वेतामधील संभाषण मोबाईलमध्ये रेकॉर्ड करताना दिसते. अंशुमन श्वेताशी अश्लील भाषेत बोलत असून तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतोय, हे स्पष्ट होतं.

हे पण वाचा.. सावळ्याची जणू सावली’ : दीड वर्षांची प्रतीक्षा संपणार, सावलीच्या आवाजाचं सत्य अखेर उघड

हा प्रोमो शेअर करताना झी मराठीने “स्त्री सन्मानासाठी नात्यांविरुद्ध उभी राहणार स्वानंदी” असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे आता स्वानंदी अंशुमनचं सत्य समरसमोर आणणार का, आणि यामुळे समर-स्वानंदीच्या नात्यात काय बदल होणार, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. Veen Doghantali Hi Tutena मधील हा टप्पा केवळ नाट्यमय नाही, तर एक ठोस संदेश देणारा ठरणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

हे पण वाचा.. हेमलता बाणे पाटकर खंडणी प्रकरणानंतर अर्चना पाटकरांच्या पाठीशी उभी राहिली अश्विनी महांगडे भावनिक पोस्ट व्हायरल

veen doghantali hi tutena swanandi anshuman truth